एकाच वेळी दोघांना डेट करत होती अनन्या पांडे, अभिनेत्रीच्या आईनेच केला मोठा खुलासा

'कॉफी विथ करण ७' मध्ये अनन्या पांडेची आई भावना पांडे आल्या असताना त्यांनी मुलीच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या.
Ananya Panday was dating 2 boys at same times, mothe Bhavana Panday revealed in koffee with karan7
Ananya Panday was dating 2 boys at same times, mothe Bhavana Panday revealed in koffee with karan7Google

Koffee With Karan 7: बॉलीवूडमध्ये ३ सुंदर आणि स्मार्ट महिला आहेत,ज्या बड्या अभिनेत्यांच्या पत्नी आहेत. भावना पांडे,महीप कपूर आणि गौरी खान करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ७' या चॅटशो मध्ये १२ व्या एपिसोडमध्ये दिसल्या. आपल्या गेस्टसोबत बातचीत करताना करणने अगदी अचानक भावना पांडेला विचारलं की,''अभिनेत्री अनन्या जी तुझी मुलगी देखील आहे तिने एकाच वेळेस दोघांना डेट केलं आहे''. हे ऐकून भावना पांड्ये थोड्या बावरल्याच. कारण अनन्यानं काही महिने आधीच आपला बॉयफ्रेंड ईशान खट्टरसोबत ब्रेकअप केलं आहे.

Ananya Panday was dating 2 boys at same times, mothe Bhavana Panday revealed in koffee with karan7
'हम साथ साथ है' फेम महेश ठाकूरला 5 करोडचा गंडा, आरोपी मयंक गोयलचं नाव घेत म्हणाला..

रॅपिड फायर राऊंड दरम्यान, करणने गौरीला तिची मुलगी आणि नव्यानं इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून एन्ट्री करणाऱ्या सुहाना खानला डेटिंग विषयी काय सल्ला देशील असा प्रश्न केला. तेव्हा गौरीनं उत्तर दिलं की,''कधीच दोन मुलांना एकाचवेळी डेट करू नको.कधीच नाही''.

मग भावना पांडेला पाहत करण म्हणाला,'' मला वाटतं की अनन्या याआधी असं करून मोकळी झाली आहे''. भावना म्हणाल्या ,''काय अनन्याने असं केलंय?'' करणने मग उत्तर देताना म्हटलं, ''हो, मला माहीत आहे की अनन्या दोन मुलांना एकाच वेळी डेट करत होती''. भावना मग उत्तर देत म्हणाल्या ,''नाही ती दोघांविषयी विचार करत होती,कन्फ्युज होती म्हणून मग तिने एकासोबत ब्रेकअप केलं''.

Ananya Panday was dating 2 boys at same times, mothe Bhavana Panday revealed in koffee with karan7
Big Boss 16: राज कुंद्रा स्पर्धक बनून येणार,फी चा आकडा आणि डिमांड्स वाचून बसेल झटका

अनन्या करणच्या शो मध्ये सातव्या एपिसोडमध्ये विजय देवरकोंडासोबत येऊन गेली होती. तेव्हा विषय निघाला होता की,विजय आणि अनन्या 'लाइगर' शूट करताना डेटवर कसे गेले होते. करणने अनन्याला मग विचारलं की,''जेव्हा तू ईशानला डेट करत होतीस तर मग विजयसोबत डेटवर कशी गेलीस?'' तेव्हा दोघे पण एकदम उत्तरले की ही एक 'फ्रेंडली डेट' होती. नंतर लगेचच करणने अनन्याकडून कन्फर्म करून घेतलं की ती ईशानला डेट करत होती.

Ananya Panday was dating 2 boys at same times, mothe Bhavana Panday revealed in koffee with karan7
R Madhavan: 'आता खूप झालं...', 'छेलो शो' च्या ऑस्कर एन्ट्रीनंतर माधवनचं मोठं विधान

अनन्या म्हणाली,''मी सिंगल आहे, कोणी मला विचारल नाही पण मी सांगते की,मी सिंगल आहे''. तेव्हा करणने विचारलं,''तू ईशानसोबत ब्रेकअप केलंस''. तेव्हा अनन्याने त्याचं बोलणं ऐकू नाही आलं असं नाटक केलं. करणच तो,पटकन म्हणाला, ''तू ईशानला डेट करत होतीस,मग ब्रेकअप केलंस. चल उगाच लपवू नकोस,सगळ्यांना माहीत होतं तू ईशानला डेट करत होतीस''. करणने अनन्याला विचारलं की,''तू कार्तिक आर्यनला डेट करत आहेस का?'' तेव्हा अनन्या म्हणाली,''आम्ही फक्त चांगले मित्र आहोत''. करणने अनन्याला हे देखील म्हटलं की,''तुला तर आदित्य रॉय कपूरही खूप हॉट वाटतो''.

Ananya Panday was dating 2 boys at same times, mothe Bhavana Panday revealed in koffee with karan7
KBC 14: विचित्र चाहत्याच्या तावडीत सापडलेले अमिताभ, मग जे घडलं ते बिग बीं कडूनच ऐका

अनन्यासोबत ब्रेकअप झाल्यावर ईशानने पहिल्यांदाच करणच्या शो मध्ये येऊन खुलासा केला होता. करणने ईशानला जेव्हा विचारलं की, ''तू काही दिवसांपूर्वीच अनन्याशी ब्रेकअप केलंस. तेव्हा लगेच करणला मध्येच थांबवत ईशान म्हणाला, ''मी ब्रेकअप केलं, पण मी तर ऐकलं की तुम्ही म्हटलं होतं की तिनं माझ्याशी ब्रेकअप केलं''. करण तेव्हा थोडं स्पष्ट करत म्हणाला,''ब्रेकअप नेहमी आपापात संगनमताने घेतला जातो''. तेव्हा करण हे देखील म्हणाला की, ''मी अनन्याला विचारलं होतं की तू ईशान सोबत रिलेशनशीपमध्ये असताना विजय देवरकोंडासोबत डेटला गेली होतीस का? तेव्हा तिनं यावर नकार दिला होता''. पण या सगळ्यावर बोलण्यास ईशाननं जास्त पसंती दर्शवली नाही,तेव्हा करणनेही विषय बदलला.

बरं,आता आईनं हा मोठा खुलासा आपल्याविषयी केल्यावर अनन्याची अवस्था कशी असेल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com