...आणि ती "हो' म्हणाली 

संकलन - भक्ती परब  
मंगळवार, 14 मार्च 2017

आणि ती "हो' म्हणाली हे खरंय; पण कशाला ते सांगतेच सविस्तर. राजश्री प्रॉडक्‍शनची निर्मिती असलेल्या मालिकांची सध्या छोट्या पडद्यावर खूपच चर्चा आहे. त्यांचीच आता "पिया अलबेला' ही नवी मालिका नुकतीच "झी टीव्ही'वर सुरू झालीय. विश्‍वामित्र आणि मेनका यांच्या कथेचा हा आधुनिक अवतार म्हणून या मालिकेकडे पाहिलं जातंय. आता ही मालिका कशी आधुनिक युगाला साजेशी करतात, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलंय. पहिले पाच एपिसोड पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. शीन दास आणि अक्षय म्हात्रे या मालिकेत पूजा आणि नरेनची मुख्य भूमिका साकारत आहेत. या मालिकेची सुरुवात काहीशी कंटाळवाणी झाली खरी.

आणि ती "हो' म्हणाली हे खरंय; पण कशाला ते सांगतेच सविस्तर. राजश्री प्रॉडक्‍शनची निर्मिती असलेल्या मालिकांची सध्या छोट्या पडद्यावर खूपच चर्चा आहे. त्यांचीच आता "पिया अलबेला' ही नवी मालिका नुकतीच "झी टीव्ही'वर सुरू झालीय. विश्‍वामित्र आणि मेनका यांच्या कथेचा हा आधुनिक अवतार म्हणून या मालिकेकडे पाहिलं जातंय. आता ही मालिका कशी आधुनिक युगाला साजेशी करतात, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलंय. पहिले पाच एपिसोड पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. शीन दास आणि अक्षय म्हात्रे या मालिकेत पूजा आणि नरेनची मुख्य भूमिका साकारत आहेत. या मालिकेची सुरुवात काहीशी कंटाळवाणी झाली खरी. पण उत्सुकता ही आहे की, आधुनिक युगातील पूजा नरेनला खऱ्या आयुष्यात पुन्हा आणण्यासाठी होकार देणार का? आणि होकार दिल्यावर त्यांच्यातील कथा पुढे काय वळण घेणार? एका नृत्य स्पर्धेच्या ठिकाणी पूजाचं वागणं, बोलणं आणि त्यानंतर तिचं नृत्य सादर करणं हे पाहून नरेनच्या वडिलांना खात्री पटते, की हीच मुलगी आपल्याला नरेनला माणसात आणू शकेल. आता तुम्ही म्हणाल, नरेनला नेमकं झालंय तरी काय? आणि पूजा त्याला माणसात आणणार म्हणजे काय करणार? तर ते असंय, की नरेन एक श्रीमंत घरातला मुलगा आहे. पण त्याचा सर्व भौतिक सुखांचा त्याग करून संन्यासी जीवन आपलंसं करण्याकडे ओढा आहे. त्याने स्वीकारलेला हा मार्ग त्याच्या आई-वडिलांना पटलेला नाहीय. त्यामुळे ते त्याचं मत बदलण्यासाठी नानाविध प्रयत्न करून थकलेत आणि शेवटचा उपाय म्हणून त्यांनी त्याच्याच वयाची मुलगी घरात आणण्याचा निर्णय घेतलाय. नरेनच्या वडिलांनी त्यांचा हा निर्णय पूजाला सांगितल्यावर पूजाला धक्का बसतो. ती त्यांना असं करण्यास नकार देऊन घरातून निघते. पण पुढील एपिसोडमध्ये पूजा त्यांच्या या निर्णयाला होकार देणार, असं दाखवण्यात येणार आहे. नरेनच्या आईने तिला शिक्षणात मदत केली म्हणून किंवा त्या दोघा उभयतांचे तिच्यावर उपकार आहेत म्हणून, की नरेनविषयीच्या सहृदय भावनेने तिने होकार दिलाय, हे पुढे कळेलच. छोट्या पडद्यावर आतापर्यंत असं कथानक सादर झालं नव्हतं. त्यामुळे या मालिकेत पुढे नरेन आणि पूजाची प्रेमकथा कशी रंगणार, याची उत्सुकता आहे. काय मग कळलं ना, पूजा म्हणजेच शीन दासने कशाला होकार दिलाय तो! उगाच कुठला भलता अर्थ काढू नका हं! ही टेलीटेल आहे. त्यामुळे काहीही घडू शकतं; पण ते मालिकेत... 

Web Title: and she said yes : sheena das