'आमची तारीख जाहीर'; केदार शिंदे यांच्या ट्विटची चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kedar shinde
'आमची तारीख जाहीर'; केदार शिंदे यांच्या ट्विटची चर्चा

'आमची तारीख जाहीर'; केदार शिंदे यांच्या ट्विटची चर्चा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मराठी चित्रपटसृष्टीला दर्जेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. ते नेहमी नवनवीन प्रयोग करत प्रेक्षकांच मनोरंजन करत असतात. सामान्य माणसाच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी केदार शिंदे उत्तम पद्धतीने मोठ्या पडद्यावर दाखवतात. केदार यांचा नवीन चित्रपट त्याच्या नावामुळे चर्चेत आला आहे. ‘बाईपण भारी देवा’ असं त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. आता सोशल मीडिया पोस्टद्वारे केदार शिंदे यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे.

केदार शिंदे यांनी ट्वीट करत ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. “कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर! ‘बाईपण भारी देवा.’ २८ जानेवारी २०२२ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!” असं ट्वीट त्यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी चित्रपटाचे पोस्टर देखील पोस्ट केलं आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात कौटुंबिक विषय मांडण्यात येणार आहे. या चित्रपटात नक्की कोण कलाकार दिसणार आहेत? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पोस्टर रिलीज करताच चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

हेही वाचा: मुंबईत कतरिना-विकीचं पुढच्या आठवड्यात लग्न?

या चित्रपटाच्या निर्मात्या माधुरी भोसले यांच्या 'स्क्रीनशॉट्स' या संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्क्रीनशॉट्स ही निर्मिती संस्था या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. टीव्ही, ओटीटी आणि अनेक क्षेत्रात स्क्रीनशॉर्टस संस्थेने दर्जेदार कलाकृती सादर करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट २८ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

loading image
go to top