Bishan Singh Bedi Bipoic: भारताचे दिग्गज माजी खेळाडू बिशन सिंग बेदी यांच्यावर येणार बायोपिक! लेकानं केली घोषणा!

अंगद हा बिशनसिंग बेदींवर बायोपिक तयार करणार आहे.
Bishan Singh Bedi  Bipoic
Bishan Singh Bedi BipoicEsakal

Bishan Singh Bedi Bipoic: भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी या वर्षी 23 ऑक्टोबरमध्ये जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने क्रिडा विश्वात शोककळा पसरली होती. बिशनसिंग बेदी यांना भारतीय क्रिकेट जगतातील अभूतपूर्व योगदानासाठी ओळखले जाते. त्यांनी भारतासाठी एकूण 77 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यांनी 273 विकेट्स घेतल्या होत्या. बेदी हे भारतातील एक सर्वोत्तम लेफ्ट आर्म स्पिनर होते.

आता लवकरच त्यांची व्यक्तिरेखा आणि जीवन प्रवास मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. बिशनसिंग बेदींवर बायोपिक तयार करण्यात येणार आहे. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अंगद बेदीने स्वतः हा खुलासा केला आहे.

Bishan Singh Bedi  Bipoic
Animal Bobby Deol: बॉबीसोबत लग्नातल्या 'त्या' सीनवर अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली,"माझ्या लग्नात असं..."

एका मिडिया पोर्टलसोबत बोलताना अंगदने याबाबत माहिती दिली. अंगदने सांगितले की तो त्याच्या वडिलांवर बायोपिक तयार करत आहे. सध्या तो अशा व्यक्तीच्या शोधात आहे जो त्याच्या बायोपिकवर काम करु शकेल. ही भूमिका कोण साकारणार याबाबत अद्याप काही माहिती नाही. मात्र अनेकांचा असा विश्वास आहे की, बेदींची भूमिका अंगदच योग्य प्रकारे साकारु शकतो.

Bishan Singh Bedi  Bipoic
Brahmastra 2: हृतिक नव्हे तर 'हा' सुपरस्टार साकारणार ब्रह्मास्त्र 2 मध्ये शिवाच्या वडिलांची भूमिका?

याबाबत बोलताना अंगद म्हणाला, "त्यांचे व्यक्तिमत्त्व इतके मोठे होते की त्याची संपूर्ण कथा एका चित्रपटात दाखवली जाऊ शकते की अनेक भागांमध्ये हे मला अजून ठरवायचे आहे. मी योग्य व्यक्तीच्या शोधात आहे.

असा एक चित्रपट निर्माता ज्याने तो काळ पाहिला आहे आणि त्याला मनापासून चित्रपट बनवायचा आहे. मला अशा व्यक्तीसोबत मला काम करायचे आवडेल. मलाही चित्रपटात भूमिका करायला आवडेल, मात्र यासाठी अनेक गोष्टी आवश्यक आहेत."

Bishan Singh Bedi  Bipoic
Ryan O' Neal Passes Away: मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का! 'लव्ह स्टोरी'च्या फेम अभिनेत्याने निधन

पुढे अंगद सांगतो की, "मला हा चित्रपट करायला आवडेल. पण त्यासाठी मी योग्य आहे की नाही हे मलाच ठाऊक नाही. मात्र मला त्यासाठी ऑडीशन द्यायला आवडेल. जर मी यासाठी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचं सिद्ध झाले आणि निर्मात्यांना मी बरोबर आहे असं वाटलं तर मी त्यात काम करेल.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com