'डॉ. काशीनाथ घाणेकर'चा टीझर प्रदर्शित

Ani Dr Kashinath Ghanekar marathi movie teaser released
Ani Dr Kashinath Ghanekar marathi movie teaser released

'डॉ. काशीनाथ घाणेकर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाची पहिली झलक सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. आपल्या अष्टपैलू अभिनयाने नटश्रेष्ठ डॉ. काशीनाथ घाणेकर यांनी मराठी रंगभूमीचा पहिला सुपरस्टार म्हणून ओळख मिळवली. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

डॉ. घाणेकर यांची भूमिका अभिनेता सुबोध भावे यांनी साकारली आहे. 1960 च्या दशकातील या सिनेमाच्या कथेत डॉ. घाणेकर या अभिनेत्याचा उद्य ते त्यांचा अस्त असा प्रवास दाखविण्यात आला आहे. डॉ. घाणेकर यांचा 'एक विलक्षण कलाकार' असा उल्लेख ट्रेलरमध्ये करण्यात आला आहे. 
 


व्यावसायिक रंगभूमीला सोनेरी दिवस आणणाऱ्या डॉ. घाणेकर यांनी मराठी रसिकांना आपल्या अभिनयाने वेड लावले होते. 'रायगडाला जेव्हा जाग येते', 'अश्रूंची झाली फुले', 'गारंबीचा बापू', 'शितू', 'तुझे आहे तुजपाशी', 'इथे ओशाळला मृत्यू', 'सुंदर मी होणार', 'आनंदी गोपाळ', 'मधुमंजिरी' अशा नाटकांतील डॉ. घाणेकर यांच्या भूमिका तुफान गाजल्या. 

सिनेमात सुबोध भावे शिवाय सुमीत राघवन हा डॉ. श्रीराम लागू, मोहन जोशी हे भालजी पेंढारकर, सोनाली कुलकर्णी ही सुलोचना दिदी, आनंद इंगळे हे वसंत कानेटकर आणि प्रसाद ओक हा प्रभाकर पणशीकर यांच्या भूमिकेत दिसतील. 'डॉ. काशीनाथ घाणेकर' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत शिरीष देशपांडे यांनी केले आहे. तर वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि श्री गणेश मार्केटींग अँन्ड फिल्मस् यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. येत्या दिवाळीत 8 नोव्हेंबरला सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com