Coronavirus : अनिल कपूरच्या मास्कची किंमत ऐकाल तर वेडे व्हाल!

Anil Kapoor  mask worth rs 9 thousand
Anil Kapoor mask worth rs 9 thousand
Updated on

मुंबई : कोरोना व्हायरसची दहशत सर्व जगात पसरली आहे. जो तो आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसत आहे. भारतातही करोनानचा प्रादुर्भाव वाढतोय. महाराष्ट्रामध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. अशातच सेलिब्रेटी आपली काळजी कशी घेत आहेत जाणून घ्या...

सर्व सामान्यांपासून अधिकारी, कलाकार मंडळी, राजकारणीही धास्तावलेले आहे. सगळेच शक्य ती काळजी घेताना आढळून येत आहे. बॉलिवूडचे स्टार देखील जिथे जाल तिथं मास्क घालत आहेत. ''मलंग'' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीतही अनेक सिनेस्टार मंडळींनी मास्क घालून एन्ट्री केली.पण सर्वांची नजर खिळली ती अभिनेता अनिल कपूर वर.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#anilkapoor steps out for a bash with his mask on #covid_19 #CoronaVirus #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

अनिल कपूरची मास्क एन्ट्री चर्चेचा विषय ठरल होता. पण आता अनिल कपूरचा मास्क देखील चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या मास्कची किंमत ऐकूण तुम्हाला धक्काच बसेल. कोरोना व्हायरस आल्यापासून मास्कचा काळाबाजार ही वाढला.  २०-३० रुपयांना मिळणारं मास्क आता ३०० रुपयांना मिळत आहे. अशातच अनिल कपूरच्या या मास्कची बातच काही निराळी आहे. या मास्कची किंमत शे-पाचशे नव्हे तर तब्बल ९३०० रु. इतकी आहे.

डिझायनर विरगिल अब्लोहनं हा मास्क खास अनिल कपूरसाठी डिझाइन केला होता. लाल रंगाच्या मास्कवर 'मास्क' असं लिहिण्यात आलं होतं.

'मलंग' या चित्रपटाच्या या पार्टीला अनिल कपूर, दिशा पटानी, आदित्य रॉय कपूर, अमृता खानविलकर, कुणाल खेमु या सगळ्यांनीच या पार्टीला स्टायलिश अंदाजात हजेरी लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com