Viral Video: 'एवढी हौस तरी कसली..', तोंडाला ऑक्सिजन मास्क लावून ट्रेड मिलवर पळणारे अनिल कपूर ट्रोल

सोशल मीडियावर अनिल कपूर यांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
Anil Kapoor Viral Video
Anil Kapoor Viral VideoEsakal

Anil Kapoor Viral Video:अनिल कपूर बॉलीवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्यांपैकी एक आहेत. वयाच्या ६६ व्या वर्षी देखील त्यांचे व्यक्तिमत्त्व भल्या भल्या यंग अॅक्टर्सना कांटे की टक्कर देतं. सोशल मीडियावर देखील ते खूप सक्रिय पहायला मिळतात.

त्यांनी नुकताच सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे,ज्यामध्ये ते ऑक्सिजन मास्क लावून दिसत आहेत. बरं खरी बातमी त्यापुढे आहे...हा ऑक्सिजन मास्क लावून ते ट्रेड मिलवर चक्क पळताना दिसत आहेत.

अनिल कपूर यांनी आपले हे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अनिल कपूर यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे-''फाइटर मोड ऑन...''

यादरम्यान अनिल कपूर यांनी काळ्या रंगाचा ट्रॅक सूट घातला आहे. तसंच,त्यांनी ऑक्सिजन मास्कही लावला आहे.(Anil Kapoor Puts On Oxygen Mask While Running On Treadmill, Netizens troll actor)

Anil Kapoor Viral Video
Prashant Damle: '12,500 हजार प्रयोगानंतर आजही चुकतो पण नाटक यशस्वी होतं कारण..', दामलेंनी सांगितलं पडद्यामागचं सीक्रेट

अनिल कपूर यांच्या या फोटोज आणि व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोबत बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री फातिमा सना शेखनं कमेंट करत लिहिलं आहे,'फायटर..', तर बिपाशा बासूनं लिहिलं आहे- 'मस्त... ',मनीष पॉलनं कमेंट करत लिहिलं आहे,'मॅन ऑन मिशन'. तर याव्यतिरिक्त रोहित शराफनं लिहिलं आहे,'यू आर अनबिलिवेबल..'.

अनिल कपूर यांच्या एका चाहत्यानं प्रशंसा करत लिहिलं आहे की,'एव्हरग्रीन', तर दुसऱ्यानं लिहिलं आहे,'यांचे वय कधी वाढणार?'

पण काही नेटकऱ्यांनी मात्र ट्रोल देखील केलं आहे. तर काहीजण ऑक्सिजन मास्क लावून का पळताय असा प्रश्न देखील करत आहेत. एकानं लिहिलं आहे,'जर मास्क लावून पळावं लागतंय तर एवढी हौस तरी काय?'

Anil Kapoor Viral Video
Nora Fatehi:'बाथटबमधून थेट पुरस्कार सोहळ्यात आलीस का?', नोराचा लूक ट्रोल

माहितीसाठा सांगतो की काही दिवसांपूर्वी अनिल कपूर 'जुग जुग जियो' सिनेमात दिसले होते. या सिनेमात त्यांच्यासोबत नीतू कपूर यांनी काम केले होते. त्यानंतर ते आता 'अॅनिमल' सिनेमात रणबीर कपूरसोबत दिसणार आहेत. या सिनेमात रश्मिका मंदाना आणि बॉबी देओल देखील आहेत.

Anil Kapoor Viral Video
Sai Tamhankar: 'सालस म्हणजे काय..,माहितीय का?,सईला नेटकऱ्यानं छेडलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com