Prashant Damle: '12,500 हजार प्रयोगानंतर आजही चुकतो पण नाटक यशस्वी होतं कारण..', दामलेंनी सांगितलं पडद्यामागचं सीक्रेट

झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्विकारल्यानंतर प्रशांत दामलेंनी आपल्या करिअरविषयी काही खुलासे करत लोकांना चकित करुन सोडलं आहे.
Prashant Damle
Prashant DamleEsakal

Prashant Damle: अभिनयाचं वरदान मिळालेलं असतानाही अभिनेते प्रशांत दामले यांनी आपलं अख्खं करीअर हे फक्त नाटकालाच वाहिलं हे आता वेगळं सांगायला नको. साडे बारा हजार नाट्यप्रयोग करुन प्रशांत दामले यांनी रेकॉर्ड बनवला अन् चाहत्यांचं मन जिंकून घेतलं.

नुकतंच त्यांना झी नाट्यगौरव पुरस्कार २०२३ च्या सोहोळ्यात पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलं. यावेळी उपस्थित प्रेक्षकांशी संवाद साधताना दामलेंनी आपला जीवनपट उलगडला. मनोरंजन सृष्टीत आपण आलेलो वेगळ्याच उद्देशानं अन् अपघातानं अभिनेता झालो असं म्हणत दामलेंनी आपल्या करिअरविषयी अनेक खुलासे झाले.

प्रशांत दामले झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार स्विकारल्यानंतर संवाद साधत म्हणाले की,''मला खरंतर मनोरंजन सृष्टीत गायक बनायचं होतं..मला गाणं छान जमायचं...पण प्रायोगिक नाटकात काम केल्यानंतर हळूहळू अभिनयाकडे वळलो . (Prashant Damle Video Viral marathi drama actor zee natyagaurav puraskar)

Prashant Damle
Rashmika Mandanna: अखेर विजय देवरकोंडा सोबतच्या रिलेशनशीपवर रश्मिकानं सोडलं मौन, ट्वीट करत म्हणाली,'अय्यो...'

'' तसं पाहिलं तर शाळेत असताना मी आता आहे त्यापेक्षा गुटगुटीत होतो त्यामुळे मैदानी खेळांपासून तर मी दोन हात लांब असायचो. मॅचमध्ये अम्पायर पर्यंत फार फार मजल मारली असेल त्यापुढे कधी गेलोच नाही''.

दामले पुढे म्हणाले,''आज इतक्या नाटकात काम करून साडे बारा हजार प्रयोगांचा टप्पा मी ओलांडला असला तरीही मी चुकतो..पण नाटक करणे म्हणजे काय तर आपला सहकलाकार चुकला तर त्याची चूक सावरणं..जे काम नेहमी कविता(अभिनेत्री कविता लाड) करते. आणि असंच करायचं असतं. तरच नाटक यशस्वी होतं''.

Prashant Damle
Amitabh Bachchan: अमिताभसाठी संजीवनी ठरला होता केबीसी शो.. मात्र बिग बी यांनी शो करु नये असं जया बच्चनना वाटत होतं..

प्रशांत दामलेंच्या एकंदरीत करिअरविषयी बोलायचं झालं तर,त्यांनी मराठी सिनेमातूनही काम केलं आहे.त्यांचे सिनेमे बऱ्यापैकी चालले पण दामलेंना मात्र सिनेमातनं हवा तसा आनंद मिळेना. म्हणूनच मग त्यांनी नाटकाला आपलं करिअर वाहून दिलं.

अभिनय साकारतानाच नाटकांची निर्मिती देखील केली. सध्या संकर्षण कऱ्हाडे लिखित 'नियम व अटी लागू' हे दामलेंनी निर्मिती केलेलं नाटक रंगमंचावर आपल्या भेटीस आलेलं आहे,ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

कविता लाड आणि त्यांच्या जोडीनं तर रंगमंच गाजवला. त्या दोघांच्या 'एका लग्नाची गोष्ट' या नाटकाच्या तर सीरिज आपल्या भेटीस आल्या. आजही या नाटकाला तितकाच उदंड प्रतिसाद मिळतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com