'मिस्टर इंडिया'ला ३४ वर्ष पूर्ण, अनिल कपूर यांनी शेअर केला मजेदार किस्सा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

त्याकाळी सुपरहिट झालेला हा सिनेमा २५ मे १९८७ ला रिलीज झाला होता. अनिल कपूर यांच्या करिअरमधील हा सिनेमा अतिशय महत्वपूर्ण ठरला होता.

मुंबई- श्रीदेवी आणि अनिल कपूर स्टारर 'मिस्टर इंडिया' हा सिनेमा कोणाच्या लक्षात नाही असं होणारंच नाही. त्याकाळी सुपरहिट झालेला हा सिनेमा २५ मे १९८७ ला रिलीज झाला होता. अनिल कपूर यांच्या करिअरमधील हा सिनेमा अतिशय महत्वपूर्ण ठरला होता. अनिल कपूर यांनी देखील हा सिनेमा त्यांच्यासाठी नेहमीच स्पेशल राहिल असं अनेकदा म्हटलं होतं. नुकतंच अभिनेता अनिल कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर 'मिस्टर इंडिया'ला ३४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. 

हे ही वाचा: अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' सिनेमाचा सेट 'या' कारणामुळे केला जाणार जमीनदोस्त

अनिल कपूर यांनी इंस्टाग्राम एक पोस्ट शेअर केली आहे, त्यांनी लिहिलंय, 'मिस्टर इंडिया या सिनेमा नेहमीच माझ्यासाठी महत्वाचा असेल. मला आठवतंय ३४ वर्षींपूर्वी आम्ही या प्रवासाची सुरुवात केली होती आणि मी आजही अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्साही असतो. जेव्हा मी या सिनेमातील 'जिंदगी की यही रित है' या गाण्याची धुन ऐकायचो तेव्हा मी केवळ किशोर कुमार यांचा आवाज आठवयाचो. तेव्हा किशोर कुमार आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल एकत्र काम करणं पसंत करत नव्हते.

किशोर दा यांच्या संपर्कात येण्यासाठी देखील मला कित्येक महिने लागले.' अनिल कपूर पुढे सांगतात, 'जेव्हा माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं तेव्हा मी त्यांच्या घरी गेलो आणि दोघांचं बोलणं करुन दिलं. याचाच परिणाम म्हणजे हे सुमधुर संगीत जे आजच्या कठीण दिवसातही आठवलं जाऊ शकतं.' 

अनिल कपूर यांनी नुकताच सुनिता कपूर यांच्यासोबत त्यांचा लग्नाचा ३६ वा वाढदिवस साजरा केला. दोघांनी १९८४मध्ये लग्न केलं होतं. अशातंच लग्नाला ३६ वर्ष झाल्याच्या निमित्ताने अनिल कपूर यांनी इंस्टाग्रामवर खास पोस्ट लिहून लग्नाच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.  

anil kapoor shares intresting story as mr india completes 34 years


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anil kapoor shares intresting story as mr india completes 34 years