अनिल कपूर यांच्या घरी आला चिमुकला पाहुणा, 'क्युटेस्ट कपूर' म्हणत करुन दिली ओळख

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Monday, 28 September 2020

अनिल कपूर यांनी नुकतंच त्यांच्या घरी आलेल्या चिमुकल्या पाहुण्याची सगळ्यांना ओळख करुन दिली आहे. त्यांनी त्यांच्या घरात आलेल्या या चिमुकल्याचे फोटो सोशल साईटवर शेअर केले आहेत.

मुंबई- बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर सोशल मिडियावर चांगलेच ऍक्टीव्ह असतात. ते नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. अनिल कपूर यांनी नुकतंच त्यांच्या घरी आलेल्या चिमुकल्या पाहुण्याची सगळ्यांना ओळख करुन दिली आहे. त्यांनी त्यांच्या घरात आलेल्या या चिमुकल्याचे फोटो सोशल साईटवर शेअर केले आहेत ज्यामध्ये ते त्याला कुशीत घेऊन बसले आहेत. 

हे ही वाचा: करण जोहर आहे एनसीबीच्या टारगेटवर? क्षितीज प्रसादने कोर्टासमोर एनसीबीबाबत केला 'या' गोष्टींचा खुलासा  

अभिनेते अनिल कपूर यांच्या घरी आलेला हा चिमुकला पाहुणा म्हणजे त्यांचा छोटा कुत्रा आहे जो त्यांच्यासोबत त्यांच्या कुशीत आराम करताना दिसतोय. अनिल कपूर यांनी त्याचे काही फोटो ट्विटवर शेअर केले आहेत जे चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. हे फोटो पोस्ट करत अनिल कपूर यांनी म्हटलंय, 'सगळ्यात क्युटेस्ट कपूरची मी तुम्हाला ओळख करुन देत आहे. रशेल क्रो कपूर, जुहुचा राजकुमार'. अनिल कपूर यांच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणावर प्रेम व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोमध्ये अनिल कपूर खुर्चीवर बसले आहेत आणि त्यांच्या मांडीवर छोटा रशेल बसलाय. अनिल कपूर यांच्या या फोटोंवर मुलगी सोनम कपूरने देखील रिऍक्ट केलं आहे. 

अनिल कपूर यांच्या करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी उमेश मेहरा यांच्या 'हमारे तुम्हारे' या सिनेमातून सहाय्यक अभिनेत म्हणून बॉलीवूडमधील करिअरला सुरुवात केली होती. १९८३ मध्ये त्यांना 'वो सात दिन' सिनेमात मुख्य अभिनेता म्हणून काम मिळालं. अनिल कपूर शेवटचे 'मलंग' या सिनेमात दिसून आले होते. सोशल मिडियावर त्यांचे फिटनेसचे व्हिडिओ प्रेक्षकांना प्रचंड आवडतात.   

anil kapoor welcomes cutest kapoor of family actor shares photos on internet  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: anil kapoor welcomes cutest kapoor of family actor shares photos on internet