अनिल कपूर यांच्या मुलीचं लग्न; जुहूमधील बंगल्यात बांधणार लग्नगाठ

मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार लग्न
rhea kapoor
rhea kapoor

अभिनेते अनिल कपूर Anil Kapoor आणि सुनिता कपूर यांची मुलगी रिया कपूर Rhea Kapoor लग्नबंधनात अडकणार आहे. शनिवारी (१४ ऑगस्ट) प्रियकर करण बुलानी Karan Boolani याच्याशी रिया लग्नगाठ बांधणार आहे. कपूर यांच्या जुहू इथल्या बंगल्यावर अत्यंत साध्या पद्धतीने विवाह पार पडणार आहे. या लग्नाला फक्त कुटुंबीय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित राहणार आहे. रिया आणि करण गेल्या १३ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. रिया ही निर्माती असून तिने 'आयशा' आणि 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तर करणसुद्धा निर्माता-दिग्दर्शक असून जाहिराती क्षेत्रातही तो काम करतो. रियाच्या 'आयशा' या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक म्हणून काम केलंय.

बहिणीच्या लग्नासाठी अभिनेत्री सोनम कपूर जुलैमध्ये लंडनहून मुंबईला आली. सोनमचा पती आनंद अहुजासुद्धा मुंबईतच आहे. २०१८ मध्ये सोनम आणि आनंदने लग्न केलं. गेले वर्षभर सोनम ही लंडनमध्ये पतीसोबत राहत होती.

rhea kapoor
'आईचा पहिला विमान प्रवास'; अमोल कोल्हेंच्या भावनिक पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव

रिया ही फॅशन विश्वातही सक्रिय आहे. ऱ्हेसन (Rheson) या फॅशन ब्रँडची ती मालकीण आहे. सोनम आणि रिया या दोघींनी मिळून हा फॅशन ब्रँड उभारला. रियाने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. २०१० मध्ये तिने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com