'अंजली भाभीचा' नवा लुक पाहिलायं, एकदम फाडू, फॅन्स झाले खुश 

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 6 December 2020

काही अभिनेत्रींना त्यांच्या नावामुळे कमी आणि त्या ज्या मालिकेत काम करतात त्यातील पात्रांच्या नावानं प्रचंड प्रसिध्दी मिळाल्याचे दिसून येते.

मुंबई - तारक मेहता का उल्टा चष्मा मधील प्रसिध्द अभिनेत्री अंजली भाभी चा नवा लुक तिनं सोशल मीडियावर शेयर केला आहे. त्याला तिच्या चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली आहे. तिचे फॅन्स त्यामुळे खुश झाले आहेत.

काही अभिनेत्रींना त्यांच्या नावामुळे कमी आणि त्या ज्या मालिकेत काम करतात त्यातील पात्रांच्या नावानं प्रचंड प्रसिध्दी मिळाल्याचे दिसून येते. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अंजली भाभी म्हणजे सुनैना फौजदार तिच्या नव्या लुकमुळे चर्चेत आली आहे.टीव्हीच्या पडद्यावर साधीशी वाटणारी सुनैना ही वास्तव आयुष्यात बोल्ड आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)

तिनं जो एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे त्यात तिनं चेक शर्ट आणि यलो रंगाचा स्कर्ट घातला आहे. त्यामुळे ती अधिक ग्लॅमरस दिसत आहे. फोटोला कमेंट देताना तिनं लिहिले आहे की, 'त्याला कुठल्या नावानं ओळखलं जातं, तर सनशाईन' असे म्हटले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunayana Fozdar (@sunayanaf)

 

मालिकेत करत असलेल्या अंजली भाभीच्या भूमिकेविषयी ती म्हणाली, मला असे वाटते की. आम्ही जे काम करतो त्यावर व्यक्त होण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहे. ज्यावेळी ते आपली प्रतिक्रिया देतात तेव्हा त्याचा स्वीकार करायला हवा.

जावईबापूंनी केलं सासूचं कौतूक! म्हणाला, ख्रिस्तोफरनं प्रशंसा केली आणखी काय हवं

आपल्याला मिळणारी पोचपावती ही आपण करत असलेल्या कामामुळे मिळते आहे. काही वेळा प्रेक्षकांकडून मिळणा-या निगेटिव्ह प्रकारच्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागतं. त्याचा स्वीकार करावा लागतो. आता माझी तुलना केली जात आहे कारण मी काम करत असलेली मालिका ही लोकप्रिय आहे. त्यातील अनेकांना प्रेक्षकांनी गौरविले आहे.

हे ही वाचा: सलमान खान करणार कतरिनाची बहीण इसाबेलला लॉंच?    

मला माझे स्वतचे स्थान तयार करायचे आहे. प्रत्येकाला त्याचे स्थान मिळविण्याचा अधिकार आहे. मला माहिती आहे की मी नेहा होऊ शकणार नाही. त्यामुळे सुनैनाच्या भूमिकेतून मी लोकांचे मनोरंजन करते. याचा मला आनंद आहे. माझी कुणाशी स्पर्धा नाहीये ना की मला कुणाची जागा घ्यायची नाही. मला केवळ माझे काम करायचे आहे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे असल्याची भावना सुनैनानं व्यक्त केली आहे. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anjali Babhi fame tarak mehata ka ulta chasma serise sunaina viral new photo