अंकिता लोखंडे म्हणते, 'ही तर आयुष्याची नवी सुरुवात आहे...' 

संतोष भिंगार्डे
Tuesday, 11 August 2020

अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडे गेली चार-पाच वर्षे  विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये राहात आहे. लवकरच ते दोघे लग्न करणार आहेत.

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे आता कमालीची आनंदित झाली आहे आणि त्याला कारण आहे तिच्या घरी झालेल्या दोन जुळ्या पाहुण्यांचे आगमन. त्यातील एक मुलगा आहे आणि एक मुलगी. एकाचे नाव आहे अबीर आणि दुसरे नाव आहे अबीरा. अंकिताने या दोन्ही जुळ्या मुलांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि आमच्या घरात दोन नवे पाहुणे आले आहेत...ही आयुष्याची नवी सुरुवात आहे असे तिने म्हटले आहे. अंकिताची होणारी नणंद वर्षा जैनला ही जुळी झाली आहेत.

 

हिंदमातासाठी आता नवा प्रयोग; पाणी वाहून जाण्यासाठी बोगद्याचा विचार, वाचा सविस्तर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडे गेली चार-पाच वर्षे  विकी जैनसोबत रिलेशनशिपमध्ये राहात आहे. लवकरच ते दोघे लग्न करणार आहेत. विकीची बहीण वर्षा जैन आहे. तिचे लग्न व्यवसायाने चार्टर्ड अकाउंट असलेल्या अभिषेक श्रीवास्तवशी झालेले आहे. वर्षा आणि अंकिता अगदी जवळच्या मैत्रिणी आहेत. दोघींचे फिरतानाचे फोटो सोशल मीडियावर कित्येकदा व्हायरल झाले आहेत. तिची होणारी नणंद वर्षाने या जुळ्यांना जन्म दिला आहे. अंकिताने हा फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात ती जुळ्या मुलांसोबत दिसत आहे. 

अभिनेत्री हेमांगी कवीने पुरुषांच्या अस्वच्छतेवर व्यक्त केला संताप, 'वेस्टर्न टॉयलेट कसं वापरावं हे कळत नसेल तर...'

''आमच्या कुटुंबात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. एका नव्या आयुष्याची सुरुवात झाली आहे. या जुळ्यांच्या जन्मामुळे आमचं कुटुंब आणखी मोठं झालंय. अबीर आणि अबीरा तुम्हा दोघांचं स्वागत..'', अशी पोस्ट अंकिताने शेअर केली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये अंकिता होती. आता सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी तिने मागणी केली आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ankita lokhande says this is new begining of life, read fill story