महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर 'अंकुश चौधरी स्पेशल' 

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 11 January 2021

सध्याचा काळ हा चित्रपटांचा नव्हे तर मालिकांचा आहे असे म्हटले जाते. मागील काही महिन्यांपासून चित्रपटांपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले होते.

मुंबई - मराठीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी हा आता वेगळ्या अंदाजात दिसून येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाटके, चित्रपटाच्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा अभिनेता अंकुश सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. तो आता एका रियॅलिटी शो मध्ये दिसणार आहे.

सध्याचा काळ हा चित्रपटांचा नव्हे तर मालिकांचा आहे असे म्हटले जाते. मागील काही महिन्यांपासून चित्रपटांपेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळात प्रेक्षकांनी मालिका पाहण्यास अधिक प्राधानमय दिले होते. टेलिव्हिजनवरील  'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' हा कार्यक्रम थोड्याच काळात प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम झाला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेली नृत्याची झलक  प्रेक्षकांना या मंचावर पाहायला मिळतेय. पूजा सावंत आणि धर्मेश सर या परीक्षकांसह अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये सहभागी होऊन स्पर्धकांना प्रोत्साहन देताना दिसतात.

बिग बॉस १४: जॅस्मिन भसीनच्या एविक्शनमुळे अली गोनी ढसाढसा रडला, आला पॅनिक अटॅक  

आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरी या कार्यक्रमात पाहुणा म्हणून सहभागी होणार आहे.11-12 जानेवारीला 'महाराष्ट्राज बेस्ट डान्सर'च्या मंचावर सुपरस्टार अंकुश चौधरी येणार असून आठवड्याचा विषय प्रेमाची गाणी हा असणार आहे. स्पर्धक रोमँटिक गाण्यांवर बहारदार परफॉर्मन्स देणार आहेत. त्यामुळे हा आठवडा प्रेक्षकांसाठी मोठ्या पर्वणीचा विषय ठरणार आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ankush chaudhari participate on Maharashtra best dancer show