Annie Wersching Demises : लोकप्रिय व्हिडियो गेम 'द लास्ट ऑफ अस' ला आवाज देणाऱ्या अभिनेत्री अ‍ॅनी वर्शिंगचे निधन

अ‍ॅनीने अ‍ॅक्शन ड्रामा सीरिज "24" मध्ये एफबीआय एजंट रेनी वॉकरची भूमिका निभावली होती.
Annie Wersching
Annie WerschingSakal

Annie Wersching Demises : अ‍ॅक्शन ड्रामा सीरिज "24" मध्ये एफबीआय एजंट रेनी वॉकरची भूमिका साकारणाऱ्या अमेरिकन अभिनेत्री अ‍ॅनी वर्शिंग यांचे वायाच्या ४५ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

वर्शिंग या दीर्घकाळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. रविवारी सकाळी लॉस एंजेलिसमध्ये त्यांचे निधन झाले. अ‍ॅनीने लोकप्रिय व्हिडियो गेम "द लास्ट ऑफ अस" साठी आवाज दिला होता.

Annie Wersching
Googleचा मोठा निर्णय, अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर्सची लागणार लॉटरी! लवकरच दिसणार हे मोठे बदल

अ‍ॅनी यांनी 2002 मध्ये 'स्टार ट्रेक: एंटरप्राइज'च्या एका भागातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

वयाच्या 24 व्या वर्षापासून त्यांनी अभिनय विश्वात प्रवेश केला. 2020 मध्ये वर्शिंग यांना कर्करोगाचे निदान झाले. अ‍ॅनी यांच्या पश्चात पती आणि तीन मुले असा परिवार आहे.

Annie Wersching
Pathaan Movie Reaction : बॉलिवूडकरांना पठाणचं भारी कौतूक! कोण काय म्हणालं पाहाच...

वर्शिंग यांच्या निधनानंतर अमेरिकन चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली असून, अनेक दिग्गज कलाकरांकडून अ‍ॅनी वर्शिंग यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com