मिफ्फ 2020 महोत्सवाची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी, 2020 या काळात हा महोत्सव पार पडणार आहे.

मुंबई, ता. 3 : मुंबई आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव अर्थात 'मिफ 2020' ची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यंदाचा 16 वा मिफ्फ महोत्सव फिल्म डिव्हिजनच्या पेडर रोडवरील सुसज्ज प्रांगणात 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी, 2020 या काळात पार पडणार असून शुभारंभाचा आणि समारोपाचा कार्यक्रम नेहरु सेंटर, वरळी येथे पार पडणार आहे.

दरम्यान विविध विभागांमध्ये अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2019 आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या लघुपट आणि माहितीपटांचे सादरीकरण करण्यात येते. मागील वर्षीच्या 15 व्या मिफ्फमध्ये 32 देशांनी सहभाग नोंदवला होता तर एकूण 793 माहितीपटांची नोंदणी झाली होती. 

 web title : Announcement of the MIFF 2020 Festival


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Announcement of the MIFF 2020 Festival