
'मी अमिताभ किंवा शाहरुख नाही, भाकरीसाठी मला काम करावे लागते'
Annu Kapoor News : बाॅलीवूड अभिनेता अन्नू कपूर आपल्या आगामी वेब सीरिज 'क्रॅश कोर्स'मुळे चर्चेत आहे. ते छोट्या ते मोठ्या पडद्यापासून चर्चित कलाकर आहेत. अन्नू कपूर आपल्या प्रत्येक अभिनयाची प्रेक्षकांवर अमीट छाप सोडत असतात. मग ते 'मिस्टर इंडिया' असो किंवा 'विक्की डोनर' या चित्रपटातील प्रत्येक भूमिकेने ते प्रेक्षकांचे मन जिंकून घेतात. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेता एका मुलाखतीत म्हणाले, की ते फक्त पैसे कमवण्यासाठी काम करतात. (Annu Kapoor Says I Am Not Amitabh Bachchan or Shahrukh Khan I Work For Money)
हेही वाचा: Aamir Khan : बाॅक्स ऑफिसवर बाॅलीवूडची कमाई होते कमी? आमिर खानने दिले उत्तर
अन्नू कपूर (Annu Kapoor) मुलाखतीत म्हणतात, सुरुवातीला मला कथित हिंदी चित्रपट उद्योगात भीती वाटत होती. पैशासाठी मी असे प्रोजेक्ट केले जी मला आवडतही नव्हते. मी टीव्हीत काम करु इच्छित नव्हतो. मात्र पैशासाठी इच्छा नसतानाही काम करावे लागले. आता कलाकारांना ओटीटी आणि टीव्हीवर यायला कमीपणा वाटत नाही. कारण यापूर्वी या माध्यमांना खालच्या नजरेंने पाहिले जात होते. पैसा बोलतो, पैसा चालत नाही. मी फक्त पैसे कमवण्यासाठी काम करतो. (Bollywood News)
हेही वाचा: रणवीर सिंगला पुन्हा न्यूड फोटोशूटची ऑफर, अभिनेत्याला 'यांनी' केली मागणी
अनेकदा कंटेण्ट आवडत नसला तरीही मला अनेक प्रोजेक्ट करावे लागतात. मला त्याचे फार दुःख होते. मात्र मी काय करु शकतो? मला माझे कुटुंबही चालवायचे आहे. मी अमिताभ बच्चन, शाहरुख खान किंवा सलमान खान नाही. मी ४० वर्षानंतरही एक खूप लहान संघर्ष करणारा अभिनेता आहे.
Web Title: Annu Kapoor Says I Am Not Amitabh Bachchan Or Shahrukh Khan I Work For Money
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..