Panipat : सदाशिवरावभाऊ विरूद्ध अहमद शाह अब्दाली; गाजणार मोठी लढाई

another poster of Panipat released today
another poster of Panipat released today

गेले काही दिवस सगळीकडे 'पानिपत'ची चर्चा सुरू आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या दिग्दर्शनामुळे या चित्रपटाला विशेष महत्त्व आलंय. पानिपतमधील विविध भूमिकांचे पोस्टर्स आणि ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकणार अशी चर्चा होत आहे. यातच पानिपतचे आणखी एक पोस्टर आज लॉन्च झाले आहे. 

दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आज पानिपतचे आणखी एक पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये मोठी तलवार दिसतीय. त्यावर मराठा व अब्दालीच्या सैन्यांची लढाई सुरू आहे. तर एका बाजूला सदाशिवरावभाऊ पेशवे (अर्जून कपूर) तर दुसऱ्या बाजूला अहमद शाह अब्दाली (संजय दत्त) दिसतोय. या फोटोला 'सदाशिवराभाऊ व्हर्सेस अहमद शाह अब्दाली : 6 डिसेंबरला एका मोठ्या लढाईचे साक्षीदार व्हा!' असे कॅप्शन दिले आहे. 

असा आहे ट्रेलर...
तीन मिनिटे चौदा सेकंदाचा हा ट्रेलर पुन्हा आपल्याला पानिपतच्या त्या युद्धभूमीवर घेऊन जातो. मराठ्यांनी सांडलेलं रक्त, बाजीराव पेशव्यांनी पानिपतच्या लढाईसाठी सदाशिवरावांची केलेली निवड, सुख-दुःखात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहिलेली त्यांची पत्नी पार्वतीबाई व करारी नजरेने समोर उभा ठाकलेला अहमद शाह अब्दाली! या सगळ्याची सांगड घालत युद्धभूमीवरच्या पराक्रमाची कहाणी सांगणारा हा चित्रपट नक्कीच सर्वांसाठी आकर्षण असेल.

'मराठा, भारतभूमी के वो योद्धा जिनके लिए उनका धर्म और कर्म उनकी वीरता है', 'सुख मे आपके पिछे व दुःख में आपके आगे खडी रहूंगी' असे दर्जेदार डायलॉग या ट्रेलरमध्ये दिसतायत. मोहनीश बहल, पद्मिनी कोल्हापूरे, झीनत अमान, सुहासिनी मुळ्ये, गश्मीर महाजनी अशी तगडी स्टारकास्ट या टित्रपटात दिसेल. आशुतोष गोवारीकरांचे कमबॅक आणि नितीन चंद्रकांत देसाई यांचे भव्यदिव्य सेट यांमुळे या ट्रेलरला चार चाँद लागले आहेत. 6 डिसेंबरला पानिपत सर्वत्र प्रदर्शित होईल.

'पानिपतची तिसरी लढाई'
पानिपतची तिसरी लढाई ही मराठे व अहमद शाह अब्दाली यांच्यात झाली होती. 14 जानेवारी 1761 ला हरियानातील पानिपत येथे ही लढाई झाली होती. सदाशिवराव पेशवे यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी ही लढाई लढली होती. या लढाईत अहमद शाह अब्दालीच्या सैन्याने मराठा सैन्याचा पराभव केला होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com