एफटीटीआयच्या सोसायटीवर बिग बॉस फेम जलोटा

Anup Jalota Apointmnet On FTTI
Anup Jalota Apointmnet On FTTI

पुणे- पुण्यातील अत्यंत नामांकित समजल्या जाणाऱ्या फिल्म अँड टेलविजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीटीआयच्या सोसायटीवर गायक आणि बिग बॉस फेम अनुप जलोटा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री ने अनुप जलोटा यांची नियुक्ती केली आहे.

जलसीन या आपल्या पासुन 37 वर्ष लहान तरुणी सोबत लग्न केल्याने अलिडे अनुप जलोटा हे मोठ्या चर्चेत आले होते, आता पुन्हा केंद्रातील भाजप सरकारने एफटीटीआय सोसायटी वर नियुक्ती केल्याने अनुप जलोटा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत,

अनुप जलोटा सोबत एफटीटीआयवर आणखी काही जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. येशु दास, कंगना रणावत, अरवींद  स्वामी, ब्रिजेंद्रपाल सिंग, दिव्या दत्ता, सतीश कौशिक आणि डॉक्टर अर्चना राकेश सिंग यांची नियुक्ती कंरण्यात आली आहे.

एफटीटीआयचे माजी विद्यार्थी म्हणून राजकुमार हिराणी, विधु विनोद चोप्रा, 
डैनी डेन्जोंगपा आणि महेश एने यांची नियुक्ती करण्यात आली आहे, सोबतच अनुपम खेर यांची एफटीटीआयच्या गव्हर्निंग बॉडी वर नियुक्ती कायम ठेवण्यात आली आहे, या नियुक्त्या तीन वर्षांच्या कालावधी साठी असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com