7 वर्षानंतर पुन्हा शाहरुख-काजोलची जमणार जोडी,पण... Shahrukh Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah Rukh Khan & Kajol To Reunite On The Big Screen After 7 Years?

7 वर्षानंतर पुन्हा शाहरुख-काजोलची जमणार जोडी,पण...

बॉलीवूडची सगळ्यात हीट ठरलेली ऑनस्क्रीन जोडी शाहरुख खान(Shah rukh Khan) आणि काजोलच्या(Kajol) चाहत्यांसाठी गूडन्यूज आहे. या दोघांनी एकत्र हीट सिनेमे दिले आहेत. आणि त्यांना एकत्र पाहणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी नेहमीच पर्वणी ठरली आहे. आता बॉलीवूड मधूनच एक बातमी पसरली आहे की शाहरुख आणि काजोल लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. आणि हा सुवर्णयोग जुळवून आणला आहे तो बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक आणि प्रत्यक्ष आयुष्यात या दोघांचा मित्र करण जोहर(Karan Johar).

हेही वाचा: 'राम सेतू' च्या पोस्टरवर मोठी चूक; अक्षय पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर

बॉलीवूड लाइफच्या रीपोर्टनुसार शाहरुख आणि काजोल पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. पण थोडं थांबा ,एवढं उत्साहित देखील होऊ नका.ते दोघं काही ,संपूर्ण सिनेमा एकत्र करणार नाही आहेत. तर एका सिनेमात ते फक्त स्पेशल परफॉर्मन्ससाठी एकत्र येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख खान आणि काजोल दिग्दर्शक करण जोहरचा सिनेमा 'रॉकी और रानी की प्रेम' कहानी या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. ते दोघेही सिनेमात पाहुणे कलाकार म्हणून दिसतील. कदाचित सिनेमात एखाद्या गाण्यातही ते एकत्र डान्स करताना दिसण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: पलक तिवारीनं आई श्वेता तिवारीच्या वैवाहिक आयुष्यावर केला मोठा खुलासा

अद्याप शाहरुख-काजोलच्या या बातमी संदर्भात अधिकृत कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. पण जर हे शक्य होणार असेल तर त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी मेजवानी असेल, शाहरुख-काजोलचा सात वर्षापूर्वी म्हणजे २०१५ मध्ये 'दिलवाले' सिनेमा आला होता. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नव्हता. त्यानंतर या दोघांनीही एकमेकांसोबत काम केलेलं नाही. आता हे सर्व प्रचलित आहे की करण जोहरसाठी शाहरुख आणि काजोल लकी चार्म आहेत. त्यामुळे जी बातमी कळाली आहे ती खरी सुद्धा असू शकते असं बोललं जात आहे. करण जोहरही अनेक वर्षांनी दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. त्यामुळे अर्थातच शक्यता आहे की करणनं आपले लकी चार्म असलेल्या काजोल-शाहरुखला रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमात कुठल्या तरी निमित्तानं आणलंच असावं.

हेही वाचा: बॉलीवूडचा प्रसिद्ध पॉप गायक 'TAZ' चं निधन; हृतिक,जॉनसाठी गायलेली हीट गाणी

रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमाचं दिग्दर्शन करण जोहरनं केलं आहे. तब्बल ६ वर्षांनी करण दिग्दर्शकाच्या खुर्चीत या सिनेमाच्या निमित्तानं बसलेला दिसत आहे. करण जोहरनं शेवटचा दिग्दर्शित केलेला ऐ दिल है मुश्किल हा सिनेमा प्रेक्षकांना भलताच आवडला होता. यामध्ये रणबीर कपूर,अनुष्का शर्मा,ऐश्वर्या राय असे कलाकार होते. तर रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमात आलिया भट्ट,रणवीर सिंग सोबत शबाना आझमी,धर्मेंद्र,जया बच्चन असे ज्येष्ठ कलाकारही दिसणार आहेत. गल्ली बॉय सिनेमात आलिया-रणवीर सिंगची जोडी मस्तच शोभली होती,आता पहायचं की रॉकी आणि रानी बनून ते प्रेक्षकांचं मन जिंकण्यात किती यशस्वी ठरतात.

Web Title: Shah Rukh Khan Kajol To Reunite On The Big Screen After 7 Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top