Anupam Kher : 'चित्रपट चांगला असेल तरच चालतो, बॉयकॉट केल्यानं नाही!' अनुपम यांचा आमिरला टोला

फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यामध्ये काश्मिर फाईल्सला नामांकन होते. मात्र त्याच्या वाट्याला पुरस्कार न आल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
anupam kher, the kashmir files,
anupam kher, the kashmir files, SAKAL

Anupam Kher Aamir Khan Boycott bollywood trend : बॉलीवूडमध्ये ज्या चित्रपट पुरस्कारांना सर्वोच्च समजले जाते त्या फिल्मफेयर अॅवॉर्डचा वितरण सोहळा पार पडला. यंदा प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या गंगुबाई काठियावाडी नावाच्या चित्रपटाचा दबदबा दिसून आला. त्यामध्ये आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी यांना गौरविण्यात आले होते.

यासगळ्यात चर्चा रंगली होती ती विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्मिर फाईल्स चित्रपटाची. ज्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दोनशे कोटींहून अधिक कमाई केली त्या चित्रपटानं देशात वेगळ्याच प्रकारचा माहौल तयार केला होता. त्यावर जसा कौतूकाचा वर्षाव झाला तसेच त्याच्यावर वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवातून टीकेचा सूरही आळवण्यात आला होता. इफ्फी महोत्सवामध्ये परदेशी परिक्षकांनी काश्मिर फाईल्सवर टीका केली होती.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

फिल्मफेयर पुरस्कार सोहळ्यामध्ये काश्मिर फाईल्सला नामांकन होते. मात्र त्याच्या वाट्याला पुरस्कार न आल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यात काश्मिर फाईल्समध्ये महत्वाची भूमिका करणारे अनुपम खेर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. काश्मिर फाईल्सला एकही पुरस्कार नाही हे पाहून वाईट वाटले. अशी प्रतिक्रिया खेर यांनी दिली होती.

anupam kher, the kashmir files,
Salman Khan : 'मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित'!, भाईजान असं का म्हणाला?

दुसरीकडे खेर यांनी चित्रपट केवळ बॉयकॉट केला म्हणून चालत नाही असे नाही तर त्यामध्ये काहीच कंटेट नसेल तर प्रेक्षक तो चित्रपट कसा चालेल, यावेळी त्यांनी आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढाचे उदाहरण दिले. तो चित्रपट बॉयकॉट झाला म्हणून पडला असे नाही तर त्यामध्ये जो कंटेट होता तोच मुळी लोकांना आवडला नाही. यामुळे तो बॉक्स ऑफिसवपर आदळला. असेही खेर सांगायला विसरले नाही.

anupam kher, the kashmir files,
Anupam Kher: अपेक्षाच नव्हती, हे लोक तर.. म्हणत अनुपम खेरनी फिल्मफेयरची इज्जतच काढली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com