दाक्षिणात्य चित्रपटांचे अनुपम खेर यांनी केले कौतुक, बाॅलीवूडला दिला हा सल्ला

दाक्षिणात्य चित्रपटांचे अनुपम खेर यांनी केले कौतुक
Anupam Kher On Bollywood Vs South Film
Anupam Kher On Bollywood Vs South Film esakal

Anupam Kher Comment On Hind Vs South Film : हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांबाबत काही दिवसांपासून बराच वाद सुरू आहे. बॉक्स ऑफिसच्या अहवालावर नजर टाकल्यास, हिंदीपेक्षा दक्षिणेतील अधिक चित्रपट चांगले प्रदर्शन करत आहेत. या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट म्हणजे 'द काश्मीर फाइल्स' ज्यात अनुपम खेर देखील होते.

आता अनुपम यांनीही हिंदी आणि दाक्षिणात्यच्या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. या दरम्यान अनुपम खेर यांनी दाक्षिणात्यच्या चित्रपटांचे कौतुक केले. त्याच वेळी हिंदी चित्रपटांबाबत ते म्हणाले की, इथे आम्ही फक्त स्टार्सवर (कलाकारांवर) लक्ष केंद्रित करतो, कंटेंटवर नाही. दक्षिणेत कंटेंटवर लक्ष केंद्रित जाते.

Anupam Kher On Bollywood Vs South Film
Liger: उद्धट विजय पुन्हा बोलला; थेट शाहरुखला दिलं चॅलेंज, म्हणाला,'तू काही...'

वास्तविक, नुकताच अनुपम खेर (Anupam Kher) यांचा कार्तिकेय-2 हा तेलगू चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने लालसिंग चड्ढा, रक्षाबंधन आणि दोबारा यांना मागे टाकले. या चित्रपटात निखिल सिद्धार्थ मुख्य भूमिकेत आहे. खेर यांनी दक्षिण भारतीय चित्रपटांच्या (South Film Industry) दृष्टिकोनाचे कौतुक केले आहे.

Anupam Kher On Bollywood Vs South Film
KBC: गुजरातच्या स्पर्धकाला रामायणच माहीत नाही,अगदी सोप्या प्रश्नाचं चुकवलं उत्तर

आम्ही प्रेक्षकांचा विचार करत नाही

निखिल म्हणतो की, जर तुम्हाला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर तुम्हाला ते आधी समजून घ्यावे लागेल. यावर अनुपम खेर म्हणतात, 'तुम्ही प्रेक्षकांचा विचार करता, तेथूनच त्रास सुरू होतो जेव्हा तुम्ही प्रेक्षकांकडे बघत नाही आणि आम्हाला वाटते की आम्ही एक उत्कृष्ट चित्रपट बनवून प्रेक्षकांवर उपकार करत आहोत.

आता तुम्ही एक चांगला चित्रपट पाहात आहात, असे त्यांना भासवता.सामूहिक प्रयत्नातून महानता येते आणि तेलुगूमध्ये चित्रपट करून मी तेच शिकलो. मी तेलगूमध्ये आणखी एक चित्रपट केला आहे. मी तमिळ भाषेतही एक चित्रपट केला आहे. मी आता मल्याळम् चित्रपट करणार आहे. (Bollywood News)

Anupam Kher On Bollywood Vs South Film
महेश मांजरेकर घेऊन येतायत.. 'एका काळेचे मणी'

बॉलीवूड हॉलिवूडचे अनुकरण करतो

अभिनेता पुढे म्हणाला, मला वाटते की तिथे मी दोघांमध्ये फरक करत नाही, परंतु मला वाटते (त्यांचा) सिनेमा प्रासंगिक आहे. कारण ते हॉलीवूडची कॉपी करत नाहीत. ते कथा सांगत आहेत आणि इथे आम्ही तारे विकत आहोत. कार्तिकेय-२ चित्रपटाबद्दल बोलायचे तर, हा एक रहस्यमय साहसी चित्रपट आहे ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन चंदू मोंडेटी यांनी केले आहे.

हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या कार्तिकेय चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटात अनुपम सहायकाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाच्या यशाबद्दल अनुपम खेरने इंस्टाग्रामवर लिहिले, "मी तर सुसाट निघालो मित्रांनो. द काश्मीर फाइल्सनंतर माझा कार्तिकेय-२ हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com