अनुपम खेर यांचा पुन्हा आमिरवर घणाघात, म्हणाले,'आता मान्य कर...' Laal Singh Chaddha ,Boycott trend | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anupam Kher on Aamir Khan's Laal Singh Chaddha And Boycott trend.

अनुपम खेर यांचा पुन्हा आमिरवर घणाघात, म्हणाले,'आता मान्य कर...'

Anupam Kher On Laal Singh Chaddha:बॉलीवूड सिनेमाच्या विरोधात सुरू असलेल्या बॉयकॉट ट्रेंडनं(Boycott Trend) पूर्ण इंडस्ट्रीलाच बाद करण्याचा वीडा उचलल्याचं चित्र सध्या दिसत आहे. आमिर खानचा(Aamir Khan) लाल सिंग चड्ढा देखील या बॉयकॉट ट्रेन्डमुळेच बॉक्सऑफिसवर फ्लॉप ठरला. सोशल मीडियावर तर अजूनही आगामी बॉलीवूडच्या सिनेमांना बॉयकॉट करण्याचा ट्रेन्ड सुरू आहे. अनुपम खेर यांनी यावर आपलं मतप्रदर्शन केलं होतं. पण आता पुन्हा त्यांनी आमिरवर निशाणा साधत आपलं तिखट मत मांडलं आहे.(Anupam Kher on Aamir Khan's Laal Singh Chaddha And Boycott trend.)

हेही वाचा: 4 अंध व्यक्ती आणि 1 हत्ती; 'दगडी चाळ २' नंतर अंकुशच्या '4 ब्लाइंड मेन' ची चर्चा

अनुपम खेर यांनी एक न्यूज एजन्सीशी बातचीत करताना म्हटलं आहे की,''बॉयकॉट ट्रेन्डचा सिनेमावर तसा फारसा वाईट परिणाम होणार नाही''. अनुपम खेर म्हणाले,''बॉयकॉट ट्रेन्डविषयी वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या जात आहेत. ट्वीटर आणि सोशल मीडियावर रोज नवनवीन ट्रेंड सुरू असतात. अचानक एखाद्या सिनेमाला एवढं महत्त्व का दिलं जात आहे. तुम्ही थेट का हे बोलत नाहीत की लोकांना तुमचा सिनेमा आवडला नाही? हे पहिल्यांदाच घडलेलं नाही की जेव्हा एखादा सिनेमा फ्लॉप ठरला आहे. मी या गोष्टीला मान्य करायला तयार नाही की बॉयकॉट ट्रेन्डमुळे सिनेमा फ्लॉप ठरेल''.

हेही वाचा: Box Office:बॉलीवूड डळमळलं,मराठी कडाडलं;3 दिवसांत 'दगडी चाळ 2' करोडोंच्या रांगेत

अनुपम खेर यांना जेव्हा विचारलं गेलं की लाल सिंग चड्ढा कधी पाहणार? तेव्हा ते म्हणाले,''आता तर माझं तो सिनेमा पहायचा काही विचार नाही आणि मनही करत नाही. जेव्हा मला वाटेल सिनेमा पहायला हवा,तेव्हा पाहीन. पण मला हे आमिर खानला विचारायचे आहे की त्यानं काश्मिर फाईल्स पाहिला का?''

शिमल्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत अनुपम खेर म्हणाले आहेत की, ''काही वर्षापू्र्वीपर्यंत लोकांना वाटायचं की आपल्या सिनेमावरनं वाद व्हावा,म्हणजे सिनेमे चालतील. मी देखील इंडस्ट्रीत इतकी वर्ष काम करतोय तेव्हा एवढं नक्कीच सांगेन की चांगले सिनेमे यशाचा मार्ग स्वतः शोधतात. मला वाटतं की जर आपण लाल सिंग चड्ढाविषयी बोलत आहोत तर जर सिनेमा चांगला असेल तर त्याला बॉयकॉट ट्रेन्डमुळे काहीच फरक पडणार नाही''.

हेही वाचा: पंकजा मुंडेंनी राजकारण सोडलं? कलाक्षेत्रातल्या धमाकेदार एन्ट्रीची चर्चा

हो,असं नक्कीच होऊ शकतं की लोकांना सिनेमा आवडला नसेल. माउथ पब्लिसिटी हे खूप महत्त्वाचं काम करतं. कदाचित काही लोकांनी दुसऱ्यांच्या तोंडातून सिनेमाला बॉयकॉट करा हे ऐकलं आणि स्वतः देखील तसाच निर्णय घेतला असेल.पण जर सिनेमा चांगला असता तर ९५ टक्के लोक सिनेमा पहायला गेले असते आणि त्यांनी उरलेल्या ५ टक्के लोकांना सिनेमा पहा असं सांगितलं असतं. प्रत्येकाला आपलं मत प्रदर्शन करण्याचा हक्क आहे.

हेही वाचा: आर्यननं वर्षभरानं इन्स्टावर पोस्ट केले फोटो; शाहरुख म्हणाला,'आत्ताच्या आता...'

माझ्याविषयी देखील खूप निगेटिव्ह बोललं गेलं होतं. पण कुणी पुढे येऊन माझी बाजू घेतली नाही. कदाचित लाल सिंग चड्ढा चांगला नसावा,ही गोष्ट आता आमिर आणि टीमने स्विकारायला हवी. मी हा सिनेमा पाहिलेला नाही. माझे देखील कितीतरी खूप चांगले सिनेमे बॉक्सऑफिसवर चालले नाहीत. माझ्या 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाला किती ट्रेन्ड केलं गेलं नकारात्मकतेने,पण सिनेमा सुपरहिट झाला. त्यामुळे आपण या ट्रेन्ड प्रकाराला संपू्र्ण दोष देणं योग्य ठरणार नाही.

Web Title: Anupam Kher On Aamir Khans Laal Singh Chaddha And Boycott

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..