
Oscar नॉमिनेशनवर अनुपम खेरनी सोडलं मौन..म्हणाले,'RRR ला मिळालं आणि काश्मिर फाईल्सला नाही म्हणजे नक्कीच..'
Oscar 2023: ऑस्कर २०२३ मध्ये 'द काश्मिर फाईल्स' विषयी अनेक दावे केले जात होते. अंदाज लावला जात होता की ऑस्कर २०२३ च्या नॉमिनेशन्समध्ये 'द काश्मिर फाईल्स'नं आपलं स्थान नक्कीच पक्कं केलं असणार. पण असं घडलं नाही.
अकादमी अॅवॉर्ड्स मध्ये डंका वाजला तो 'RRR' सिनेमाचा. या सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्याला ओरिजनल सॉंग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं. आता 'द काश्मिर फाईल्स' ऑस्करमधून बाहेर पडण्यावर आणि RRR ला ऑस्करमध्ये नॉमिनेशन मिळाल्यावर अनुपम खेर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अनुपम खेर यांनी राजामौलींच्या आरआरआर ला नॉमिनेशन मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला. हा समस्त भारतीयांसाठी गौरवाचा क्षण आहे असं ते म्हणाले. पण त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होत होती की 'द काश्मिर फाईल्स' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचं त्यांना नक्कीच वाईट वाटलं आहे.
अनुपम खेर म्हणाले- ''आरआरआर ने क्रिटिक्स चॉइस अॅवॉर्ड,गोल्डन ग्लोब मध्ये बेस्ट सॉंग कॅटेगरीत पुरस्कार पटकावला. भारतीय सिनेमासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपण या क्षणाला सेलिब्रेट करायला हवं. द काश्मिर फाईल्स मध्ये त्यांना काहीतरी नसेल पटलं. मी पहिला व्यक्ती असेल ज्यानं ट्वीट करत ही प्रतिक्रिया दिली आहे. कारण खरंच नाटू नाटू गाणं लोकांना थिरकायला लावत आहे. आज सगळीकडे त्याचाच आवाज घूमतोय''.
Brut इंडियासोबत बातचीत करताना अनुपम खेर म्हणाले आहेत की, ''आतापर्यंत जेवढ्या सिनेमांची पाश्चिमात्य देशातील लोकांनी प्रशंसा केली होती,त्यात भारताची गरिबी दाखवली होती. यात काही सिनेमे परदेशातील लोकांनीही बनवले होते. मग ते रिचर्ड Attenborough असोत की डेनी बोयल असोत.
असं पहिल्यांदाच घडलंय जिथे हिंदुस्तानी आणि तेलुगु सिनेमा म्हणा किंवा भारतीय सिनेमा म्हणूया ज्यानं ऑस्करच्या मेनस्ट्रिम सिनेमाच्या कॅटेगरीत एन्ट्री केली आहे. अनुपम खेर यांनी आशा व्यक्त केली आहे की 'नाटू नाटू' गाणं भारतात ऑस्कर घेऊन येईल.
हेही वाचा: ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा
द काश्मिर फाईल्स सिनेमा २०२२ मधील सगळ्यात अधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक आहे, कमी बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर आपल्या प्रदर्शनानं सगळ्यांना हैराण करून गेला होता.
काही दिवसांपूर्वी सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दावा केला होता की 'द काश्मिर फाईल्स' २०२३ च्या ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आला आहे,पण अग्निहोत्रींचा हा दावा फेल ठरला. हा सिनेमा आता पूर्णपणे ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
अकादमी अवॉर्ड पुसरस्कार सोहळा १२ मार्चला होणार आहे. भारताकडून RRR व्यतिरिक्त् दोन डॉक्यूमेन्ट्री,'ऑल दॅट ब्रीद्स' आणि 'द एलिफंट विस्पर्स' यांना नॉमिनेशन मिळालं आहे. आता पहायचं जागतिक प्लॅटफॉर्मवर भारताला यश मिळतं की हुलकावणी देऊन जातं.