अनुपम खेर यांनी आईसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ केला पोस्ट

anupam kher
anupam kher

मुंबई- बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक असलेले अनुपम खेर सोशल मिडियावर खुप ऍक्टीव्ह असतात. नेहमीच प्रेरणादायक आणि मजेदार पोस्ट करणा-या अनुपम खेर यांनी यावेळी आईसोबतचा त्यांचा डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळ्यांच्याच चेह-यावर आनंद येईल. चाहत्यांमध्ये तर हा व्हिडिओ चांगलाच ट्रेंड होतोय आणि सोशल मिडियावर या व्हिडिओचं कौतुक देखील होत आहे.

सोशल मिडियावर आई-वडिलांशी संबंधित असलेल्या व्हिडिओंना चांगली पसंती मिळतेय. त्यातंच अनुपम खेर यांनी त्यांच्या आईसोबतचा डान्स व्हिडिओ शेअर केल्यावर चाहत्यांमध्ये सकारात्मकतेचं वातावरण पाहायला मिळतंय. या व्हिडिओमध्ये अनुपम खेर आणि त्यांच्या आईसोबत अभिनेता अनुपम खेर यांचे भाऊ राजू खेर सुद्धा डान्स करताना दिसतायेत. हा डान्स पाहिला तर खरंच या व्हिडिओमध्ये सगळेजण क्युट डान्स करत आहेत. हा क्युट व्हिडिओ सगळ्यांच्या मनावरचा ताण हलका करेल असाच आहे.

या व्हिडिओमध्ये तीघही हॅपी डान्स चॅलेंजवाल्या म्युझिकवर डान्स करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिलंय, बंधु-भगिनींनो, सादर करत आहोत सगळ्या डान्सस्टाईलची आई. आमचं डान्सिंग स्कील अजुनही तसंच आहे. मात्र त्यापेक्षाही आमच्या आनंदाची भावना जबरदस्त आहे. नेहमीप्रमाणे आई सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. 

त्यांनी या पोस्टमध्ये असंही म्हटलंय की, कोणीही हा डान्स बघताना बिट्टू किंवा राजूकडे या आम्हा दोन भावंडांकडे पाहत नाहीयेत. त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली आहे की, अशा गोष्टी रोज रोज पाहायला नाही मिळत. जय हो. या व्हिडिओसोबत त्यांनी दुलारीरॉक्स, पॉझिटीव्हिटी सारखे हॅशटॅग शेअर केले आहेत.

हा व्हिडिओ पोस्ट करण्यामागचं कारण असं दिसतंय की, सध्या सोशलमिडियावर जे तणावाचं वातावरण आहे ते थोडं हलकं करुन लोकांमध्ये आनंद वाटण्याचा एक छोटा प्रयत्न करत आहेत.       

anupam kher shared a video of his mother dulari happy dance challenge and she dancing with her sons  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com