अशोकस्तंभावरील सिंहांच्या दिसणाऱ्या दातांवर अनुपम खेर यांचे ट्वीट चर्चेत

गेल्या दोन दिवसांपासून भारताच्या नवीन संसद भवनावर सेंट्रेल विस्टा प्रकल्पा अंतर्गत स्थापित करण्यात आलेल्या अशोकस्तंभा वरनं भलताच वाद पेटला आहे
Anupam Kher’s reaction came on Ashoka Pillar issue
Anupam Kher’s reaction came on Ashoka Pillar issueGoogle

गेल्या दोन दिवसांपासून भारताच्या नवीन संसद भवनावर सेंट्रेल विस्टा प्रकल्पा अंतर्गत स्थापित करण्यात आलेल्या अशोकस्तंभ(Ashok Piller) वरनं भलताच वाद(Controversy) पेटला आहे. खूप लोकांचा दावा आहे की,राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोकस्तंभावरील सिंहांना हिंसक दाखवलं गेलं आहे,जिथे मूळ अशोक स्तंभावरील सिंह शांत दाखवण्यात आले आहेत. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर(Modi Government) सडकून टीका केली. सोशल मीडियावर देखील या मुद्द्यावरनं मोठा भडका उडाला. आता या प्रकरणात बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर(Anupam Kher) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.(Anupam Kher’s reaction came on Ashoka Pillar issue)

Anupam Kher’s reaction came on Ashoka Pillar issue
Good Luck Jerry: जान्हवीच्या तोंडी बिहारी शीव्या, वाचा स्पेशल ट्रेनिंगविषयी

अनुपम खेर यांनी अशोक स्तंभाच्या मुद्द्यावर एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पंतप्रधान संग्रहालयातून घेतला गेला आहे. व्हिडीओत राष्ट्रीय प्रतीक अशोकस्तंभाची नवी प्रतिकृती दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना अनुपम खेर यांनी लिहिलं आहे की,''अरे भावा,सिंहाला दात असतात तर ते दिसणारच ना. शेवटी हा स्वतंत्र भारताचा सिंह आहे. गरज पडल्यास तो डरकाळीही मारू शकतो. जय हिंद!'' अनुपम खेर यांचे ते ट्वीट बातमीत जोडलेले आहे.

अशोकस्तंभ वादावर विवेक अग्निहोत्री यांनी देखील ट्वीट केले होते. दिग्दर्शकाने नवीन अशोकस्तंभा संदर्भात वाद छेडणाऱ्या विरोधकांना शहरी नक्षलवादी म्हणवत त्यांची खिल्ली उडवली.

Anupam Kher’s reaction came on Ashoka Pillar issue
'हे तर शहरी नक्षलवादी'; अशोकस्तंभ वादावरनं अग्निहोत्रींनी विरोधकांना झापलं

सोमवारी ११ जुलै,२०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सेंट्रल विस्टा प्रकल्पा अंतर्गत स्थापित करण्यात आलेल्या या अशोकस्तंभाच्या प्रतिकाचं अनावरण करण्यात आलं. यादरम्यान लोकसभेचे स्पीकर ओम बिडला आणि राज्यसभेचे वरिष्ठ सभापतूी हरिवंश देखील उपस्थित होते. राष्ट्रीय प्रतीक हे सारनाथमधील सम्राट अशोकाच्या स्तंभाची प्रतिकृती आहे. यामध्ये चार सिंह वेगवेगळ्या दिशांना तोंड केलेले नजरेस पडत आहेत. आरोप आहे की सरकारनं जाणूनबुजून या नव्यानं स्थापित करण्यात आलेल्या अशोकस्तंभावरील सिंहांच्या चेहऱ्यांना हिंसक बनवलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com