Metro In Dino: अनुपम यांनी शिकवला अंडे का फंडा, 'मेट्रो इन दिनों'च्या सेटवरून समोर आला हा मजेदार व्हिडिओ

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांचा एक लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे.
 anupam kher
anupam kherSakal

बॉलीवूडच्या दमदार अभिनेत्याचा उल्लेख केला तर त्यात अनुपम खेर यांचे नाव नक्कीच येईल. अनुपम खेर यांचे नाव त्यांच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. आगामी काळात अनुपम खेर दिग्दर्शक अनुराग बासू यांच्या 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटात दिसणार आहेत.

दरम्यान, अनुपम यांनी सोशल मीडियावर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुराग बसू अभिनेता अनुपम खेरसाठी डोसा बनवताना दिसत आहेत.

शनिवारी अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की 'मेट्रो इन दिनों' चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बसू चित्रपटाच्या सेटवर अनुपम खेरसाठी अंडा डोसा बनवताना दिसत आहेत.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनुपम खेर यांनी लिहिले आहे की- 'आजची ताजी बातमी, अनुराग बसूने मेट्रो इन दिनोंच्या सेटवर माझ्यासाठी अंड्याचा डोसा बनवला आहे. पहा, शिका, खा आणि आनंद घ्या. अंड्याचा डोसा खाल्ल्यानंतर अनुपम यांनी अनुरागचे कौतुक केले.

 anupam kher
Shahid Kapoor: कबीरसिंग आता प्रितीसोबत नव्हे तर क्रितीसोबत..बुलेटवर रंगला रोमान्स! पोस्टर व्हायरल

'चित्रपटातील भूमिकाही चांगली होती आणि ताटातील डोसाही उत्कृष्ट होता. काहीही होऊ शकते. नमस्कार अनुराग बाबू.' अंडा डोसा खाल्ल्यानंतर अनुपम खेर यांनी अनुराग बसूचे अशा प्रकारे कौतुक केले. अनुपम खेर आणि अनुराग बसू यांचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच, चाहते या व्हिडिओला प्रचंड लाइक आणि कमेंट करत आहेत.

दिग्दर्शक अनुराग बासूच्या 'मेट्रो 'इन दिनों' या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात अनुपम खेर व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, पंकज त्रिपाठी, अली फजल, नीना गुप्ता, कोंकणा सेन आणि फातिमा सना शेख यांसारखे सेलिब्रिटी आहेत. मात्र, 'मेट्रो इन दिनों' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com