Shahid Kapoor: कबीरसिंग आता प्रितीसोबत नव्हे तर क्रितीसोबत..बुलेटवर रंगला रोमान्स! पोस्टर व्हायरल

Shahid Kapoor-Kriti Sanon
Shahid Kapoor-Kriti SanonEsakal

Shahid Kapoor-Kriti Sanon: बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर हा त्याच्या फर्जी या वेबसिरिजमुळे चांगलाच चर्चेत होता. त्याने या वेबसिरिजच्या माध्यमातुन ओटीटीवर धमाकेदार एंट्री केली. त्याच्या ही वेबसिरिज तुफान चालत आहे. या सिरिजने अनेक रेकॉर्ड तयार केले.

शाहिद हा नेहमीच त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. त्याची चॉकलेट बॉय इमेज त्याच्या चाहत्यांना खुपच आवडते. मात्र आता शाहिद केवळ चॉकलेट बॉयच्या इमेजसाठीच नाही तर वेगवेगळ्या भुमिकासाठी चाहत्यांना आवडू लागला आहे.

Shahid Kapoor-Kriti Sanon
Kangana Ranaut: अरेच्चा कंगना कौतूकही करते! 'या'अभिनेत्रीसाठी पोस्ट शेअर करत म्हणाली, 'चुपचाप चित्रपट..'

शाहिद आणि राशी खन्नाची जोडी प्रेक्षकांना खुपच आवडली. या जोडीची हा पहिल वेळ होती. आता शाहिद पुन्हा एकदा नव्या जोडीसोबत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसत आहे.

सुपरस्टार शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांची जोडी लवकरच एका लव्ह स्टोरीत चित्रपटात दिसणार आहे. ही पहिलीच वेळ असेल जेव्हा शाहिद आणि क्रिती एका चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या या अनटोल्ड रोमँटिक चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर समोर आला आहे.

या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.रिलीज झालेल्या पोस्टरबद्दल सांगायचे तर, शाहिद आणि क्रिती बीचवर बाइकवर रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. दोन्ही स्टार्स बाईकवर बसून एकमेकांना किस करताना या पोस्टरमध्ये दिसत आहेत.

Shahid Kapoor-Kriti Sanon
Shreyas Talpade: 'अब रुल पुष्पा का…', श्रेयस तळपदेची अल्लू अर्जूनसाठी खास पोस्ट व्हायरल..

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीनतम पोस्ट शेअर केली. तरणच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया देखील मुख्य भूमिकेत आहेत.

Shahid Kapoor-Kriti Sanon
Madhuri Dixit: 'गुड फ्रायडे' च्या शुभेच्छा देऊन फसला माधुरीचा नवरा...नेटकऱ्यांनी भरवली शाळा

मॅडॉक चित्रपटाचे दिग्दर्शक दिनेश विजन आणि दिग्दर्शक अमित जोशी आणि आराध्या या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा हा अनटायटल्ड चित्रपट या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रिलीज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com