Anurag Kashyap : 'मी कधीही शाहरुख अन् सलमानसोबत कामच करणार नाही', कारण...? प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बोलून गेला!

Anurag Kashyap News: अनुरागनं यापूर्वी त्याच्या एका मुलाखतीमध्ये मला आता नवाझुद्दीन, पंकज त्रिपाठी आणि विकी कौशल यांना देखील चित्रपटात रोल देण्यासाठी भीती वाटते.
Anurag Kashyap On Shah Rukh Salman
Anurag Kashyap On Shah Rukh Salmanesakal

Anurag Kashyap On Shah Rukh Salman : बॉलीवूडमध्ये आपल्या चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यशस्वी झाला आहे. त्याला चाहतावर्ग वेगळा आहे. त्यानं पाँच या चित्रपटापासून दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली होती. त्याच्या चित्रपटांवरुन वादही झाला होती. त्याचा सेन्सॉर बोर्डावर राग आहे.

अनुरागनं बॉलीवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. मात्र अजून सलमान, शाहरुख आणि आमिर सोबत स्वतंत्रपणे काम केले नसल्याचे दिसून आले आहे. याविषयी एका मुलाखतीमध्ये अनुरागनं स्पष्टपणे त्याची भूमिका मांडली आहे.

अनुराग हा त्याच्या परखड भूमिकेसाठी ओळखला जाणारा दिग्दर्शक आहे. आजवर त्यानं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमुळे तो प्रेक्षकांच्या आवडीचा दिग्दर्शक झाला आहे.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

अनुरागनं यापूर्वी त्याच्या एका मुलाखतीमध्ये मला आता नवाझुद्दीन, पंकज त्रिपाठी आणि विकी कौशल यांना देखील चित्रपटात रोल देण्यासाठी भीती वाटते. असे सांगितले होते.

त्याचे म्हणणे असे की, मी कमी बजेटमध्ये चित्रपट तयार करणारा दिग्दर्शक आहे. हे कलाकार आता खूपच मोठे झाले आहेत. त्यामुळे मला त्यांना त्यांची फी देता येणार नाही. मी बोलल्यावर ते माझ्या एका शब्दावर देखील काम करण्यास तयार होती. पण मला ते नको आहेत.

यावेळी त्यानं आतापर्यत आपण शाहरुख, सलमान यांच्यासोबत काम का केले नाही याविषयी सांगितले आहे. तो म्हणाला, जेवढा मोठा कलावंत तेवढं त्याच्यासोबत काम करताना दवाब येतो.

तुम्ही ज्यांची नावं घेता ते अभिनेते खूप मोठे आहेत. त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना खूप अपेक्षा असतात. अशावेळी मी एक प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून जेव्हा काही वेगळ्या गोष्टी करु पाहतो तेव्हा माझ्यापुढे आव्हान असते.

एवढ्या मोठ्य कलाकारांच्या चाहत्यांना खूश करणे हे सगळ्यात महत्वाचे असते. एक दिग्दर्शक म्हणून माझी एक भूमिका आहे. मला जर माझी गोष्ट सांगायची असेल तर ती माझ्या पद्धतीनं सांगितली गेली पाहिजे. तुम्ही ज्या कलाकारांची नावं घेतली आहेत ते या सगळ्या अटींना तयार होतील असेही नाही. म्हणून मला त्यांच्यासोबत काम करण्याची भीती वाटते. असेही अनुरागनं यावेळी सांगितले.

Anurag Kashyap On Shah Rukh Salman
Jawan: नाना पाटेकर यांनी जवान, गदर 2 वर साधला निशाणा? म्हणाले, "मी सहन करु शकलो नाही..."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com