अन् मोदींविरूद्ध केलेल्या ट्विटचा अनुराग कश्यपवरच बूमरँग; कल्कीवरून केलं ट्रोल

वृत्तसंस्था
सोमवार, 30 डिसेंबर 2019

अनुरागने काल एक ट्विट केले होते. ज्यात त्याने लिहिले होते की, 'जिसकी बिवी छोड के चलीं जाती है और फॅमिली नहीं होती है, पता है ना आगे चलके वो क्या बनता है? मोदी जी से पुछो?' असे ट्विट अनुरागने केल्यावर त्याच्यावर टिकेचा वर्षाव झाला.

मुंबई : सीएए आणि एनआरसीविरोधात देशात संतापाची लाट पसरलेली असतानाच अनेक बॉलिवूड कलाकारांनीही या आंदोलनात उडी घेतली होती. अनुराग कश्यप हे या आंदोलनात आघाडीवर होते. अनुराग नेहमीच पंतप्रधान मोदींवर टीका करताना दिसतात. पुन्हा एकदा त्यांनी मोदींवर टीका करणारे ट्विट केले आणि तेच ट्विट त्यांच्यावर उलटून पडलेले दिसत आहे. 

जावेद जाफरी CAA वरुन झाला ट्रोल, कंटाळून सोडलं ट्विटर !

अनुरागने काल एक ट्विट केले होते. ज्यात त्याने लिहिले होते की, 'जिसकी बिवी छोड के चलीं जाती है और फॅमिली नहीं होती है, पता है ना आगे चलके वो क्या बनता है? मोदी जी से पुछो?' असे ट्विट अनुरागने केल्यावर त्याच्यावर टिकेचा वर्षाव झाला. कारण त्याची पत्नी कल्की कोचलीन व अनुराग यांचाही घटस्फोट झाला आहे. त्यामुळे अनुरागलाही कुटूंब नाही, त्यामुळे त्याने मोदींबद्दल असे वक्तव्य करणे अयोग्य आहे, असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अनुरागच्या या ट्विटवरून नेटकऱ्यांनी त्याला तुझंही लग्न झालं होतं अन् तुझीही बायको तुला सोडून गेली आहे अशी आठवण करून दिली आहे. यामुळे ट्विटरवर Kalki ट्रेंडमध्ये होती. 

'सॅक्रेड गेम्स'फेम ही अभिनेत्री आहे प्रेग्नंट!

 

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anurag Kashyap gets troll on tweet targeting PM Modi