Anurag Kashyap reacts to ‘dog of cinema’ Martin Scorsese,''डॅम्म इट!'गॉड ऑफ सिनेमा'सोबत 'डॉग ऑफ सिनेमा' काय करीत आहे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anurag Kashyap
अनुराग कश्यप भडकला आणि चिडून म्हणाला,'भो-भो'.... #anuragkashyap#postviral#martinscorsese#americandirector#bollywoodentertainment#

अनुराग कश्यप भडकला आणि चिडून म्हणाला,'भो-भो'

sakal_logo
By
प्रणाली मोरे

अनुराग कश्यपचे(Anurag Kashyap) सिनेमे म्हटलं की भडक दृ्श्य,बोल्ड सीन,खून-रक्तपात,मारामारी,सस्पेन्स,थ्रील असा मसाला पाहिजेच पाहिजे. गॅंग्ज ऑफ वासेपूर,देव डी,मनमर्झियॅा,लस्ट स्टोरीज,अगली,ब्लॅक फ्रायडे या आणि अशा अनेक सिनेमांचं दिग्दर्शन-निर्मिती अनुराग कश्यपनं केली आहे. अनुराग कश्यप त्याच्या सिनेमांमुळे जेवढा चर्चेत राहिला तेवढाच त्याच्या काही वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकांच्या रोषाला सामोरा गेलाय. तो नेहमीच सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. नुकताच त्यानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला अनं त्या फोटोवर काही चांगल्या प्रतिक्रियांसोबतच काही तिखट,बोच-या शब्दाच्या प्रतिक्रियाही ट्रोलर्सनी नोंदवल्या. ट्रोलर्सने दिलेली प्रतिक्रिया जितकी व्हायरल झाली तितकीच अनुरागने ट्रोलर्सला दिलेले उत्तर चर्चेत आले.

हेही वाचा: ऋता दुर्गुळेनं जाहीर केली लग्नाची तारीख...कधी?

अनुरागने नुकताच अमेरिकेचे दिग्गज दिग्दर्शक मार्टिन स्कॉसेझी यांच्यासोबतचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. आणि त्याला त्याने कॅप्शन दिले होते ,'गॉड ऑफ सिनेमा'. हा फोटो त्याने मार्टिन स्कॉसेझी यांच्या ७९व्या वाढदिवसाचं औचित्य साधून शेअर केला होता. या फोटोत अनुराग खाली वाकून मार्टिन यांच्या पाया पडताना दिसत आहे तर मार्टिन त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला आशिर्वाद देत आहेत. अनुरागला एकदा मार्टिन यांनी पत्र लिहिलं होतं. ज्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं,''मी माझ्या सिनेमाच्या कामात व्यस्त आहे पण त्यातनं वेळ काढत तु मला पाठवलेले काही सिनेमे मी पाहिले. तुझे 'देव डी' आणि 'गॅंग्ज ऑफ वासेपूर" हे सिनेमे खूप एन्जॉय केले. एका जागी खिळवून ठेवणारे सिनेमे तू बनवले आहेस. कधीतरी आपण नक्की भेटू. जर तू आता कधीतरी न्यूयॉर्कला आलास तर मी न्यूयॉर्कमध्येच आहे,आपण भेटू. तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा.'' हे पत्र २०१२ मध्ये मार्टिन यांनी लिहिलं होतं. पुढे २०१३ मध्ये अनुरागला मार्टिन यांच्याशी भेटण्याचा योग आला आणि ते भेटले. तेव्हा काढलेला तो फोटो गेल्या १७नोव्हेंबरला अनुरागने शेअर केला होताआणि त्यावर त्यानं दिलेल्या कॅप्शनमुळे तो ट्रोल झाला.

Anurag Kashyap,Martin Scorsese

Anurag Kashyap,Martin Scorsese

या फोटोवर अनेकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण एका ट्रोलरने मात्र अनुरागला ट्रोल करीत म्हटलं आहे,''डॅम्म इट!'गॉड ऑफ सिनेमा'सोबत 'डॉग ऑफ सिनेमा' काय करीत आहे?'' असे बोलून एकाअर्थाने त्या ट्रोलरने अनुरागला 'डॉग ऑफ सिनेमा' म्हणून संबोधत त्याला ट्रोल केलं आहे. ट्रोलरच्या या कमेंटवर अनेकांनी अनुरागची बाजू घेत त्याला 'लॉर्ड' म्हणूनही संबोधलंय तर काहींनी स्माइल इमोजी टाकून ट्रोलरची बाजू घेत अनुरागची खिल्ली उडवलीय. पण गप्प राहील तो अनुराग कसला. अनुरागनेही या ट्रोलरला फक्त एका तिखट शब्दात प्रतिक्रिया दिलीय. अनुराग कश्यपने म्हटलंय 'भो-भो'....पण काहीवेळातच अनुरागने ती पोस्ट डिलिट केलेली दिसून येत आहे.

अनुराग आता तापसी पन्नू अभिनित 'दोबारा' हा साय-फाय थ्रीलर सिनेमा घेऊन आपल्या भेटीस येतोय. "हा सिनेमा लोकांना नवीन काहीतरी दाखवेल,मी खूप उत्सुक आहे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यासाठी", असं अनुराग त्याच्या एका मुलाखतीत म्हणाला.

loading image
go to top