esakal | 'आता हा शेवट आहे', प्रख्यात दिग्दर्शक अनुराग असं का म्हटला?
sakal

बोलून बातमी शोधा

anurag kashyap

'आता हा शेवट आहे', प्रख्यात दिग्दर्शक अनुराग असं का म्हटला?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा (bollywood) प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यप (anurag kashyap) हा त्याच्या वादग्रस्त स्वभावामुळे परिचित आहे. सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांविरोधातही त्यानं अनेकदा पुढाकार घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी मोदी सरकारच्या शेतकऱ्यांच्या विधेयकांनाही त्यानं विरोध केला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, नागरिकत्वाच्या मुद्दयावर त्यानं सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या होत्या. त्याला त्याच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. आता तो चर्चेत आला आहे त्याचे कारण म्हणजे त्याच्या एका शॉर्ट फिल्मच्या विरोधात एकानं न्यायालयात याचिका दाखल केली आहे. (anurag kashyap short film in netflix ghost stories complaint registered against objectionable scene yst88)

वास्तविक चित्रपटांच्या दुनियेत आपल्या वेगळेपणामुळं अनुरागकडं पाहण्याचा त्याच्या चाहत्यांचा दृष्टिकोन हा नेहमी वेगळा असतो. त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. मात्र आता त्याच्या चित्रपटातील संकल्पना वादाचा विषय़ होताना दिसत आहे. त्यामुळे अनुरागच्या अडचणीत वाढ झाली आहे. नेटफ्लिक्सकडे (netflix) अनुरागच्या एका शॉर्ट फिल्मच्या विरोधात एक तक्रार आली आहे. ती शॉर्ट फिल्म ही 2020 मध्ये प्रदर्शित झाली आहे. त्या शॉर्ट फिल्मचे नाव घोस्ट स्टोरीज (ghost stories) असे आहे.

या शॉर्ट फिल्ममध्ये अभिनेत्री शोभिता धुलिपाला यांच्यावर जो एक सीन चित्रित करण्यात आला आहे त्याविषयी एकानं आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावर नेटफ्लिक्सनं आपली प्रतिक्रियाही दिली आहे. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या घोस्ट स्टोरीजमध्ये वेगवेगळ्या फिल्ममेकर्सच्या शॉर्ट फिल्मस प्रदर्शित झाल्या होत्या. त्यामध्ये अनुराग कश्यपची एक शॉर्ट फिल्म होती. मिड डे या दैनिकानं दिलेल्या माहितीनुसार शोभिता धुलिपाला यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या त्या प्रसंगावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामध्ये ती गर्भपात झाल्यानंतर ते भ्रुण खाताना दाखवण्यात आली आहे.

हेही वाचा: राज कुंद्रानं केला अत्याचार, शर्लिन चोप्राचा आरोप

हेही वाचा: तोऱ्यात धावली होती कोर्टात, जुहीनं आता का घेतली माघार ?

याचिकाकर्त्याचे असे म्हणणे आहे की, त्या दृश्याची काहीच गरज नाही. त्यात जर दिग्दर्शकाला काही नवीन चित्रित करायचे होते तर त्यानं गर्भपाताच्या प्रसंगातून गेलेल्या महिलांना सुचना द्यायला हवी होती. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या याचिकेवर 24 तासांच्या आत उत्तर पाठवण्यास सांगण्यात आले होते. नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, आम्ही संबंधित निर्मात्यांशी संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. अनुरागनं देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं लिहिलं आहे की, तर आता हे सुरु झालं आहे. नेटफ्लिक्सकडे घोस्ट स्टोरीजवरुन अनेक तक्रारी आल्या आहेत. हा शेवट म्हणावा लागेल.

loading image
go to top