esakal | राज कुंद्रानं केली लैंगिक जबरदस्ती, शर्लिन चोप्राचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

actress sherlyn chopra

राज कुंद्रानं केला अत्याचार, शर्लिन चोप्राचा आरोप

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - पॉर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला राज कुंद्रा आता आणखी अडचणीत सापडला आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शर्लिन चोप्रानं त्याच्यावर आरोप केले होते. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला काम करण्याची ऑफर त्यानं दिली होती. मात्र त्याला नकार दिल्यानंतर त्यानं आपलं नाव आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. अशाच प्रकारचा आणखी एक आरोप अभिनेत्री पुनम पांडेनं केला होता. मात्र शर्लिनचा दुसरा आरोप फारच गंभीर आहे. (Sherlyn Chopra accuses Raj Kundra of sexual assault yst88)

शर्लिननचा जवाब पोलिसांनी नोंदवुन घेतला आहे. त्यात तिनं जो खुलासा केला आहे त्यामुळे राज आणखी संकटात येण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी राजनं न्यायालयात जामीनासाठी कोर्टात अर्ज केला होता. मात्र न्यायालयानं फेटाळला. तसेच शर्लिनचाही अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. शर्लिननं सांगितलं आहे की, त्यानं माझ्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. मुंबई क्राईम ब्रँचनं तिला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यावेळी तिनं काही धक्कादायक आरोप राजवर केले आहेत.

शर्लिननं यापूर्वी राजवर एप्रिल 2021 मध्ये एक तक्रार केली होती. आताच्या आरोपामध्ये शर्लिननं सांगितलं आहे की, राजनं तिच्यावर बळजबरी केली. आपण त्याला नकार देत असताना देखील तो ऐकत नव्हता. आपण एका लग्न झालेल्या व्यक्तीमध्ये अडकणार नाही. तसेच त्याच्या कोणत्याही बिझनेस डीलमध्ये सहभागीही होणार नाही. हे त्याला सांगितलं होतं. मात्र यासगळयाकडे राजनं दुर्लक्ष केलं.

हेही वाचा: आयुषमान म्हणतो, 'पार्टीमध्ये गाणी गायला, नाचायलाही तयार'

हेही वाचा: मड आयलंडमधील 'राज' बाहेर, अभिनेत्री पीडितेनं सांगितली व्यथा

शर्लिन म्हणते राजनं सांगितलं होतं की, त्याचे आणि शिल्पाचे कौटूंबिक संबंध तणावाचे आहेत. त्यांच्यात वाद सुरु होते. 19 जुलै रोजी पोलिसांनी अभिनेत्री शिल्पाची चौकशी केली. तिच्या घरी छापा टाकण्यात आला. यावेळी काही गोपनीय माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

loading image
go to top