esakal | अनुरागची अँजिओप्लास्टी; हृदयविकाराचा आला होता झटका
sakal

बोलून बातमी शोधा

anurag kashyap

अनुरागची अँजिओप्लास्टी; हृदयविकाराचा आला होता झटका

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द दिग्दर्शक, निर्मात आणि अभिनेता अनुराग कश्यपची (anurag kashyap ) अँजिओप्लास्टी (angioplasty) झाली आहे. त्याला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दिग्दर्शनाच्या बाबत आपले वेगळेपण जपून ठेवण्यात अनुरागची वेगळी ओळख आहे. त्याचे सिनेमे हे त्याच्या चाहत्यांसाठी आगळी पर्वणी असते. आपल्या कलाकृतीने त्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. अनुराग हा सोशल मीडियावर हा अॅक्टिव्ह असणारा दिग्दर्शक आहे. (anurag kashyap undergoes angioplasty after heart attack now recovering)

अनुरागला उपचारासाठी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेव्हा त्याची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यातून त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर वैदयकीय सल्लानुसार त्याच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. आता त्याच्या प्रकृतीत सुधार असल्याची माहिती त्याच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे.

इ टाईम्समध्ये आलेल्या एका वृत्तामध्ये अनुरागला ( anurag kashyap ) काही दिवसांपूर्वी छातीत दुखत असल्याची बातमी प्रसिध्द झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या हृदयात ब्लॉक असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर त्याला शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्याल आले होते.

हेही वाचा: आर्थिक संकटात असल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर चिडले 'नट्टू काका'

हेही वाचा: Neena Gupta: 'डिलिव्हरीसाठी पैसेसुद्धा नव्हते, पण..'

अनुरागच्या ( anurag kashyap ) एका जवळच्या व्यक्तीनं सांगितलं की, आता त्याची शस्त्रक्रिया झाली आहे. त्याच्या तब्येतीत सुधार होताना दिसत आहे. डॉक्टरांनी त्याला एक आठवड्यापर्यत आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर तो पुन्हा त्याच्या काही प्रोजेक्टच्या कामाला सुरुवात करणार आहे.