esakal | इंग्लंडच्या रस्त्यावर फुललं 'विरुष्काचं' प्रेम, फोटो व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

anushka and virat

इंग्लंडच्या रस्त्यावर फुललं 'विरुष्काचं' प्रेम, फोटो व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर (india tour vs england) आहे. यानिमित्तानं बीसीसीआयनं (bcci) खेळाडूंच्या परिवारातील सदस्यांना दौऱ्य़ावर नेण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (anushka sharma) इंग्लंडमध्ये आहे. हे दोघेही सध्या इंग्लंमध्ये भटकंतीचा आनंद घेताना दिसत आहे. जगातील सुंदर देशांपैकी एक असणाऱ्या इंग्लंडमध्ये ते फिरत आहेत. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर दोघांच्याही चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (anushka sharma enjoying in england street with virat kohli photos viral yst88)

पुढील दिवसांत भारत इंग्लंडसोबत पाच टेस्ट मॅच खेळणार आहे. (five test match serise) अजून ती सिरिज सुरु व्हायला काही दिवसांचा अवधी आहे. दरम्यानच्या काळात भारतीय संघातील अनेक खेळाडू पर्यटनाचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यात प्रामुख्यानं विराट आणि अनुष्काच्या फोटोंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कमेंट मिळताना दिसत आहे. सध्या ते इंग्लंड़मधील वेगवेगळ्या प्रेक्षणीय स्थळांवर मनमुराद फेरफटका मारताना दिसत आहे.

यावेळची क्षणचित्रं त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहेत.अनुष्कानं ते फोटो आपल्या इंस्टावरुन शेयर केले आहेत. त्यात तिनं ब्राऊन रंगाचा टी शर्ट परिधान केला आहे. विराट ब्लॅक रंगाच्या स्वेटशर्ट आणि ब्राऊन ट्राऊझरमध्ये सुंदर दिसतो आहे. ते दोघेही मोठ्या आनंदात ही इंग्लंड़ टूर इंजॉय करताना दिसत आहेत. त्यांच्या त्या फोटोंना प्रेक्षकांनी पसंतीही दर्शवली आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्कानं एक फोटो शेयर केला होता, त्यात ती आपली मुलगी वामिका बरोबर दिसून आली होती.

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय टीम ही 4 ऑगस्टपासून 6 सप्टेंबर पर्य़त पाच टेस्ट मॅच खेळणार आहे. भारतीय संघासाठी इंग्लंडकडून मोठे आव्हान असणार आहे. 2007 नंतर भारतीय संघानं इंग्लंडमध्ये विजय मिळवलेला नाही. त्यांनी अद्याप कोणतीही सिरिज जिंकलेली नाही. काही दिवसांपूर्वी भारतीय संघानं न्युझीलंडकडून पराभव स्वीकारत वर्ल्ड चॅम्पियनशिपही गमावली आहे.

हेही वाचा: सलमानपासून दूर राहणं माझ्यासाठी चांगलं; एक्स गर्लफ्रेंडचा खुलासा

हेही वाचा: 'बिग बी' म्हणाले म्हणून बदलला 'राष्ट्रपती भवनातील' नियम

2017 मध्ये अनुष्का आणि विराटचं लग्न झालं. अनुष्काच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास ती शाहरुख बरोबर झिरो नावाच्या चित्रपटामध्ये दिसली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. अनुष्कानं प्रॉडक्शन हाऊसही सुरु केलं आहे. तिच्या बुलबुल नावाच्या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

loading image