अनुष्काच्या 'परी'चे दुसरे पोस्टर आले

टीम ई सकाळ
सोमवार, 10 जुलै 2017

सध्या अनुष्का शर्मा जब हॅरी मेट सेजल या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी असली तरी तिच्या आगामी सिनेमांचे प्रमोशन करण्यासाठीही ती तत्पर आहे. कारण सोमवारी सकाळीच अनुष्काने 9 फेब्रुवारी 2018 ला रिलीज होणाऱ्या आपल्या परी या चित्रपटाचे दुसरे पोस्टर ट्विट करून लाॅंच केले. 

मुंबई : सध्या अनुष्का शर्मा जब हॅरी मेट सेजल या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी असली तरी तिच्या आगामी सिनेमांचे प्रमोशन करण्यासाठीही ती तत्पर आहे. कारण सोमवारी सकाळीच अनुष्काने 9 फेब्रुवारी 2018 ला रिलीज होणाऱ्या आपल्या परी या चित्रपटाचे दुसरे पोस्टर ट्विट करून लाॅंच केले. 

पहिल्या पोस्टर प्रमाणे या पोस्टरमध्येही निळ्या रंगाची शेड आहे. यातील परी जमिनीवर निपचित पडल्याचे दिसत असून त्याच्या मांडीवर तिचा गाॅगलही आहे. प्रथमदर्शनी तिला कोणीतरी वरून खाली लो़टून दिल्याचे दिसते. या पोस्टरवरुन हा  चित्रपट भीषण असल्याचे वाटते. बाकी या चित्रपटाबद्दल कोणी फारसे बोलायला उत्सुक नाही. आम्ही या चित्रपटाची प्रसिद्धी टप्प्याटप्प्याने करू. तोवर तुम्ही या सिनेमाबद्दल आडाखे बांधा असे या चित्रपटाच्या टिमकडून समजते. 

Web Title: anushka sharma film pari new poster esakal news

टॅग्स