अनुष्का शर्मा अभिनेत्री तर आहेच उत्तम; पण...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 March 2020

अनुष्काला निर्मिती क्षेत्रात पाच वर्षं पूर्ण झाली आहेत.

अनुष्का शर्मा अभिनयासोबतच निर्मितीतही नाव कमावत आहे. हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याबरोबरच 2015 मध्ये तिने तिच्या "क्‍लीन स्लेट' या प्रॉडक्‍शन कंपनीतून "एनएच 10' या चित्रपटाची निर्मिती केली आणि निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अभिनयसुद्धा केला होता आणि यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकनही मिळालं होतं. विशेष म्हणजे या चित्रपटाला आणि अनुष्काला निर्मिती क्षेत्रात पाच वर्षं पूर्ण झाली आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

Angrezi Medium Review : पटकथेत फसलेले ‘मीडिअम’ मनोरंजन

याबाबत ती म्हणाली, "निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकण्याचा माझा निर्णय फारच सहज होता. काहीतरी वेगळं करणं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हाच या मागचा हेतू होता. "एनएच 10' या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा माझा हेतू पूर्ण झाला आहे.' या चित्रपटानंतर तिच्या प्रॉडक्‍शन कंपनीतून तिने "परी' आणि "फिलौरी' या चित्रपटांची निर्मिती केली होती. आता अनुष्का निर्माती म्हणून पुन्हा कोणत्या चित्रपटातून समोर येणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 

'एनएच 10' चित्रपटात अनुष्काने उल्लेखनीय काम केले होते. तसेच तिने निर्मिती केलेल्या फिलौरी या चित्रपटाच्या वेगळ्या विषयामुळे तो चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anushka Sharma have successfully completed her 5 years in production