
अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तिला तिच्या घरात डायनासोर दिसून आला आहे.
मुंबई- कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये आहे. या दरम्यान सेलिब्रिटी देखील त्यांचा वेळ घरातंच कुटुंबासोबत घालवत आहेत. कोणी घरात साफसफाई करतंय तर कोणी डान्स करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करतंय. सध्या सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ते घरात बसून जे काही करत आहेत त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करताना दिसत आहेत.अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील असाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात तिला तिच्या घरात डायनासोर दिसून आला आहे.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली अनेकदा घरात मजा मस्ती करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. असाच एक विराट कोहलीचा व्हिडिओ अनुष्काने तिच्या सोशल साईटवर शेअर केला आहे. ट्वीटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये अनुष्काने लिहिलंय, 'मी एका डायनासोरला पाहिलं.' या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली दिसून येतोय. विराट दरवाजाच्या मागून डायनासोरसारखा चालत येतो आणि मध्येच कॅमेराकडे पाहून डायनासोरसारखा आवाज काढतो आणि निघून जातो.
अनुष्काने शेअर केलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोकांना खूप आवडतोय. याआधी देखील अनुष्काने विराटसोबतचा एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला ज्यात ती विराटला चिडवत होती. ए कोहली चौका मार ना चौका हा तिचा विराटसोबतचा व्हिडिओ चाहत्यांनी व्हायरल केला. इतकंच नाही तरयावर अनेकांनी टिकटॉक व्हिडिओ देखील बनवले.
I spotted .... A Dinosaur on the loose pic.twitter.com/mrYkICDApw
— Anushka Sharma (@AnushkaSharma) May 20, 2020
तसंच विराटचे केस कापतानाचा व्हिडिओ देखील अनुष्काने शेअर केला होता. लॉकडाऊनमध्ये विराटचा हेअरकट करताना हा व्हिडिओ पाहून मग चाहत्यांनी देखील त्यांना फॉलो करायची संधी सोडली नाही. अनुष्का आणि विराटची ही मजा मस्ती चाहते चांगलेच एन्जॉय करत आहेत.
anushka sharma shared a video of virat kohli saying that she spotted a dinosaur