esakal | लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री रविना टंडनने केलं शूट, कोरोनामुळे सेटवरच्या वातावरणाचा अनुभव केला शेअर

बोलून बातमी शोधा

ravina

रविनाने कोरोना व्हायरस दरम्यान केलेल्या या पहिल्या शूटचा अनुभव कसा होता याविषयी तीने पोस्ट केली आहे. 

लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री रविना टंडनने केलं शूट, कोरोनामुळे सेटवरच्या वातावरणाचा अनुभव केला शेअर
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- कोरोना व्हायरसमुळे सध्या लॉकडाऊन सुरु आहे आणि लॉकडाऊनमध्ये शूटींगला देखील बंदी आहे. मात्र बॉलीवूड अभिनेत्री रविना टंडनने नुकतंच एका शोसाठी शूट केलं आहे. या शूट दरम्यान रविना टंडनने सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पूर्ण पालन केल्याचं कळतंय. रविनाने कोरोना व्हायरस दरम्यान केलेल्या या पहिल्या शूटचा अनुभव कसा होता याविषयी तीने पोस्ट केली आहे. 

हे ही वाचा: मलाईका अरोराने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये चाहत्यांना दिसली लग्नाची तारीख?

रविनाने पीएम केअर्स फंडच्या एका शोसाठी नुकतंच शूट केलंय. या शो मध्ये रविना पाहुण्याची भूमिका साकारतेय. याविषयी अनुभव शेअर करण्यासाठी तिने इंस्टाग्रामवर एक पोस्च शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये रविनाने लिहिलंय, 'सध्याच्या परिस्थितीतील आमचे शूटींगचे दिवस, जिथे आम्हाला आमच्या मेकअप स्वतःच व्यवस्थित करुन पाहावं लागतंय, सोशल डिस्टंन्सिंग पाळत शूटींग करावं लागत आहे. पीएम केअर्स फंडच्या एका शूटसाठी मी पाहुणी कलाकार आहे. कॅमेरापासून जवळपास ५० फूट लांबून शूट केलं आहे इतकंच नाही तर झूम लेन्स वापरुन शूट करण्यात आलं आहे. आश्चर्य वाटतंय की आता आपल्याला या नवीन परिस्थितीसोबत समेट करावा लागणार आहे.'

रविनाने या पोस्टसोबत तिचा एक फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती स्वतःचा मेकअप पाहताना दिसत आहे. हा फोटो शूटींगच्या आधी रविनाने फोनवरुन काढला आहे. लॉकडाऊनमध्ये रविना टंडन तिचे फिरण्याचे दिवस मिस करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने पती अनिलसोबत तिचे फिरण्याच्या दिवसांचे फोटो शेअर केले होते. एवढंच नाही तर रविनाने तिचा फोटो शेअर करत हे ही म्हटलंय की ती लॉकडाऊन संपण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.    

raveena tandon shoots for pm cares show amid lockdown shares post