esakal | कोरोना योद्ध्यांना विराट अनुष्काचा मानाचा मुजरा
sakal

बोलून बातमी शोधा

Virat and anushka sharma

कोरोना योद्ध्यांना विराट अनुष्काचा मानाचा मुजरा...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढतो आहे. त्याला रोखण्यासाठी सर्व स्तरातून उपाययोजना केल्या जात आहे. बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनीही लोकांना सुरक्षित राहण्यासाठी आवाहन केले आहे. नागरिकांनी घरातच राहावे, एकमेकांची काळजी घ्यावी, आपल्यामुळे कुणाला कोरोना होऊ नये यासाठी जबाबदारीचे भान ठेवण्यासाठी आता अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करत आहेत. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का (Anushka Sharma) यांची एक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी कोरोना योध्द्यांचं कौतूक केलं आहे.

विराट (Virat Kohli) आणि अनुष्का सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळात मदतीसाठी सक्रिय सहभागही घेतला आहे. काही दिवसांपासून बॉलीवूड बरोबरच इतर क्षेत्रातील सेलिब्रेटींचा मदतीसाठी ओघ वाढला आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. याचा फटका त्यांच्या इमेज ब्रॅण्डिंगला बसु लागल्यानं त्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.

कोरोना वाढत असताना त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी जी कोरोना फ्रंटलाईन वॉरियर्सची जी टीम आहे त्यांचे कौतूक विराट आणि अनुष्कानं केलं आहे. कुठलीही तमा न बाळगता हे योध्दे (Corona Warrior) अविरतपणे आपली जबाबदारी पार पाड़त आहेत. त्यांना आपण सलाम केला पाहिजे असे आवाहन या दोघांनी केले आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच हे सगळे शक्य झाल्याची भावनाही त्या दोघांनी व्यक्त केली आहे. कोरोनाची दुसरी लाट सध्या सर्वांच्या डोकेदुखीचा विषय़ झाली आहे.

हेही वाचा: बॉलिवूड 'मॉम्स'चे खास Photos

हेही वाचा: ‘भाऊ गेलायं आणि तू मजा करतेय, लाज कशी वाटत नाही?’

अनुष्कानं (Anushka Sharma) सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता दुस-यांच्या सेवेसाठी जोखीम पत्करणा-या योध्यांना सलाम केला आहे. तिनं लिहिलं आहे की, मी त्या सर्व योध्द्यांची आभारी आहे. त्यांनी निस्वार्थीपणानं आपलं काम केलं आहे. माझ्या देशाचे तुम्ही सर्व खरे शिपाई आहात याचा मला गर्व वाटतो. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार. विराटनही एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यानं सर्व कोरोना सेवकांना धन्यवाद दिले आहेत.