Anushka Shetty Birthday: 'काहीही झालं तरी प्रभासशी...' अनुष्कानं सांगून टाकलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anushka Shetty Birthday

Anushka Shetty Birthday: 'काहीही झालं तरी प्रभासशी...' अनुष्कानं सांगून टाकलं

Anushka Shetty: टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टी आणि बाहुबली फेम प्रभास यांच्याविषयी चाहत्यांना काही नव्यानं सांगण्याची गरज नाही. आज अनुष्काचा बर्थ डे आहे. त्यानिमित्तानं आपण तिच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. अनुष्का आणि प्रभासची केमिस्ट्री प्रेक्षकांना भलतीच आवडली होती. प्रेक्षकांनी त्या चित्रपटापासून त्या दोघांच्या जोडीला पसंत करण्यास सुरुवात केली.

अनुष्कानं वेगवेगळ्या मुलाखतीमधून तिच्या रिलेशनशिपवरुन खुलासा केला आहे. एस एस राजामौली यांच्या बाहुबलीनं मोठमोठे विक्रम करुन आपली वेगळी ओळख साऱ्या चित्रपटसृष्टीला करुन दिली आहे. त्यांच्या दोन्ही चित्रपटांमध्ये अनुष्कानं प्रभावी भूमिका साकारून प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. आता चर्चा अनुष्का आणि प्रभासच्या लग्नाची आहे. त्यावरुन आपण काहीही झालं तरी प्रभासशीच लग्न करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

बाहुबलीची देवसेना सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती तिचा ४१ वा वाढदिवस आहे, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये अनुष्कानं मोठी कामगिरी केली आहे. तिचं नाव आता प्रभासशी जोडले गेले आहे. प्रभासनं तर एकदा तिचं लग्न थांबवलं होतं. आज तिच्या जन्मदिनाच्या निमित्तानं काही रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. अनेकांना एक गोष्ट माहिती नसेल ती म्हणजे बाहुबलीच्या चित्रिकरणाच्यावेळीच अनुष्काचे लग्न ठरले होते. मात्र तेव्हा प्रभासनं ते लग्न थांबवले होते. त्यामागे एक खास कारण होते.

हेही वाचा: Mahesh Manjrekar: मांजरेकरांचा मावळा 'सत्या' का होतोय ट्रोल?

अनुष्काचं लग्न तोडण्यामागे प्रभासचं तिच्यावर प्रेम असणं हे कारण नव्हतं. तर प्रोफेशनल कारणामुळे प्रभासनं तो निर्णय घेतला होता. बाहूबलीनंतर तीन वर्ष प्रभासनं कोणतीही फिल्म साईन केली नव्हती. त्यानं त्यावर खूप मेहनतही घेतली होती. त्याला वाटत होतं की, अनुष्कानं देखील खूप मेहनत घ्यावी. या कारणासाठी त्यानं ते लग्न थांबवलं होतं.

हेही वाचा: Mahesh Tilekar: खोटा इतिहास दाखवून गल्ला भरणं म्हणजे.. ऐतिहासिक चित्रपटांवर महेश टिळेकरांची सडकून टीका