
ए आर रहमान यांची मुलगी खातिजा विवाह बंधनात
संगीतकार ए. आर. रहमान (A R Rahman) यांची मुलगी खातिजा रहमान (khatija rahman) हिचा विवाह रियासदीन शेख मोहम्मदशी यांच्याशी पार पडला. ही आनंदाची बातमी ए आर रहमान यांनी स्वतः दिली. आपल्या मुलीच्या लग्नाचे फोटो त्यांनी इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत. 'निकाह' समारंभातील या फोटो रहमान यांचे संपूर्ण कुटुंब दिसत आहेत. हे फोटो शेअर होताच चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा: यशोमती ठाकूर यांना भाजप कडून मुख्यमंत्री पदाची ऑफर,पण..
एआर रहमान यांची मुलगी खातिजा आणि रियासदीन शेख मोहम्मद यांचा २९ डिसेंबर रोजी साखरपुडा (सगाई) झाला होता. नुकताच या जोडप्याचा विवाह पार पडला. याच सोहळ्यातील एक फोटो शेअर करत ए आर रहमान यांनी एक सुंदर कॅप्शन लिहिले आहे, "या जोडप्याला विधात्याचे आशीर्वाद मिळो.. ' पुढे त्यांनी चाहत्यांना उद्देशून लिहिली आहे की, 'तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी धन्यवाद'
हेही वाचा: भाडीपाच्या 'बेरोजगार'ची का होतेय चर्चा? काय आहे विषय?
त्यांनी शेअर केलेल्या फोटोर ए आर रहमान, त्याची पत्नी सायरा बानो आणि त्यांची मुले, आमीन आणि रहीमा आणि नवविवाहित जोडपे दिसत आहेत. ए आर रहमानची आई करीमा यांचा फोटोही नवविवाहित जोडप्याजवळ आशीर्वाद म्हणून ठेवण्यात आला आहे. खातीजानेही लग्नाचा फोटो शेअर केला आहे. 'या दिवसाची मी आतुरतेने वाट पाहत होते. माझ्या माणसाशी अखेर मी विवाह बंधनात अडकले' असे तिने म्हंटले आहे.
Web Title: Ar Rahmans Daughter Khatija Gets Married
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..