भाडीपाच्या 'बेरोजगार'ची का होतेय चर्चा? काय आहे विषय? | bhadipa new regional web series 'B.E.Rojgar' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhadipa new regional web series B.E.rojgar

भाडीपाच्या 'बेरोजगार'ची का होतेय चर्चा? काय आहे विषय?

मराठी मनोरंजन विश्वात नाविन्यपूर्ण प्रयोग करणारी आघाडीची डिजिटल वाहिनी म्हणजेच भारतीय डिजिटल पार्टी, (bhartiya digital party) अर्थात भाडीपा. (bhadipa) या वाहिनेने आजवर अनेक विषय सादर केले आणि गाजवलेही. आता भाडीपा एक वेगळीच वेबसिरीज घेऊन आले आहे. सध्या या वेबसिरीजचा प्रोमो प्रदर्शित झाला असून त्याला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. गावापासून शहरापर्यंत घराघरातल्या प्रत्येक तरुणाची व्यथा अत्यंत गमतीशीर आणि रंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न भाडीपाने केला आहे.

हेही वाचा: साडी नेसली पण ब्लाउज विसरली.. प्राजक्ता माळीची भलतीच तऱ्हा..

या वेब सिरीजचे नाव वरकरणी 'बेरोजगार' असले असे तरी खऱ्या अर्थाने 'बी. इ. रोजगार' असे आहे. बी. इ. हा म्हटलं की आपल्यापुढे लगेचच लाखो इंजिनियर्स उभे राहतात. अशाच तरुण इंजिनियर्सची व्यथा आणि त्यांच्या रोजगाराची फरपट विनोदी पद्धतीने चितारणारी ही वेब सिरीज आहे. ही भाडीपाची पहिली रिजनल वेब सिरीज (regional web series) आहे. या वेबसिरीज मधून पश्चिम महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग केलेले बेरोजगार मित्र आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे प्रमुख भूमिकेत अभिनेत्री सई ताम्हणकर (sai tamhankar) असणार आहे.

नोकरीसाठी वणवण करणारी सई या वेब सिरीजमध्ये पूर्णतः वेगळ्या बाजाची भूमिका साकारत आहे. या वेब सिरिजचे चित्रीकरण नुकतेच इचलकरंजी येथे झाले. त्यावेळी नदी काठी संपूर्ण संचासोबत काढलेला फोटो सईने पोस्ट केला होता. एकीकडे वेब सीरिजच्या सकस आशयावर शंका घेतली जात असतानाच पूर्ण कुटुंबासोबत पाहता येईल अशी वेब सिरीज भाडीपाने तयार केली आहे. इंजिनियरिंग केलेले हे तीन मित्र नेमकी काय धमाल घडवणार आहेत, आपल्या स्वप्नांची पुर्तता करताना त्यांचा काय गोंधळ उडणार आहे ते या वेब सिरींजमधून दिसेल.

Web Title: Bhadipa New Regional Web Series

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top