A.R.Rahman: कॅनडातील रस्त्याला 'ए.आर.रहमानचं' नाव! 'मोझार्ट ऑफ मद्रास' भावूक |A R Rehman Indian musician naming Canada street | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A.R.Rahman news

A.R.Rahman: कॅनडातील रस्त्याला 'ए.आर.रहमानचं' नाव! 'मोझार्ट ऑफ मद्रास' भावूक

AR Rahman: ऑस्कर विजेता भारतीय संगीतकार ए आर रहमान यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. साऱ्या जगभर रहमान यांच्या संगीताचा चाहतावर्ग पसरला आहे. त्यानं आपल्या संगीतानं श्रोत्यांना वेड (entertainment news) लावलं आहे. मणिरत्नम यांच्या रोजा पासून सुरु झालेला त्याचा प्रवास अद्याप सुरु आहे. आपलं संगीत हे इतर संगीतकारांहून वेगळं असावं या ध्येयानं प्रेरित झालेल्या (bollywood musician) रहमान यांच्या संगीताचे चाहते अमाप आहेत. एखाद्या चित्रपटाला रहमानचं संगीत असतं तेव्हा प्रेक्षक आवर्जुन तो चित्रपट थिएटरमध्ये पाहण्यास जातात. केवळ बॉलीवूडच नाहीतर हॉलीवूडच्या वेगवेगळ्या चित्रपटांना रहमाननं संगीत दिलं आहे.

आता तमाम भारतीयांसाठी गौरवास्पद असणारी बातमी म्हणजे रहमान याचं नाव देण्यात आलं आहे. मोझार्ट ऑफ मद्रास अशी ओळख असलेल्या रहमानच्या शिरपेचात यानिमित्तान आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. या प्रथितयश संगीतकारानं भावूक होत कॅनडा सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी तो भावूक झाल्याचे दिसून आले आहे. संगीत क्षेत्रामध्ये गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या रहमानचा सन्मान करण्यासाठी कॅनडातील रस्त्याला त्याचे नाव देण्यात आले आहे. यापूर्वी देखील 2013 मध्ये परदेशातील एका शहरातील रस्त्य़ाला रहमान (अल्लाह रखा रहमान) यांचे नाव देण्यात आले होते.

हेही वाचा: 'Bye Bye आंटी!' मलायकाच्या फोटोंवर भन्नाट प्रतिक्रिया

रहमाननं सोशल मीडियावर ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यानं कॅनडाच्या महापौरांचा फोटोही शेयर केला आहे. त्यात त्याचे नाव देण्यात आल्याचे पत्रकही आहे. मार्खम शहर, फ्रँक स्कारपिट्टी आणि कॅनडामधील सर्व नागरिकांचा मी आभारी आहे. असं रहमाननं म्हटलं आहे. त्यानं ही पोस्ट शेयर करताच चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावरुन रहमानचं अभिनंदन करण्यात आलं आहे.

हेही वाचा: Ranveer Singh Bold Photoshoot: रणवीरचा जवाब नोंदवला!, दोन तास चौकशी

Web Title: Ar Rehman Oscar Winner Indian Musician Honors Naming Canada Street Viral Tweet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..