गणपती विसर्जनात घुमणार 'आराराsss राss राss'चा आवाज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं रिलीज करण्यात आले आहे. तसेच हे गाणं आतापासून काही ठिकाणी वाजत आहे. त्यामुळे गणपती विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी हे गाणं तरुणाईच्या पसंतीस नक्कीच उतरेल. 

पुणे : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 'आराराsss राss राss' हे नवं गाणं येत आहे. हे गाणं 'मुळशी पॅटर्न' या चित्रपटातील असून, प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ते स्वत: या गाण्यावर थिरकले आहेत. त्यामुळे गणपती विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी हे गाणं तरुणाईला नक्कीच थिरकवेल, अशी आशा आहे.

सोशल मिडीयावर सध्या 'आराराsss राss राss' हे गाणं लोकांचे लक्ष वेधत आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे तर नरेंद्र भिडे यांनी गाण्याला संगीत दिले आहे. गायक आदर्श शिंदे यांनी हे गाणं गायलं आहे. 
 

'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. तसेच हे गाणं आतापासूनच बऱ्याच ठिकाणी वाजत आहे. त्यामुळे गणपती विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी हे गाणं तरुणाईच्या पसंतीस नक्कीच उतरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ararara song in Mulshi Pattern movie launched on the occasion of ganpati immersion