Sshura Khan : 'गेल्या दोन दिवसांपासून...' इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं, अरबाजची पत्नी शूरा वैतागली!

अरबाजच्या पत्नीनं इंस्टा अकाउंट हॅक ( Arbaaz Khan wife Sshura Khan Instagram) होताच नाराजी व्यक्त केली आहे.जी नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे.
Arbaaz Khan wife Sshura Khan
Arbaaz Khan wife Sshura Khanesakal

Arbaaz Khan wife Sshura Khan : बॉलीवूडचं नवं जोडपं अरबाज खान आणि शूरा खान हे गेल्या काही (Arbaaz Khan wife Sshura Khan) दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यांचं नव्यानं झालेलं लग्न,त्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचे व्हायरल झालेले व्हिडिओ अन् फोटो यामुळे ते मनोरंजन विश्वात सध्या ट्रेडिंगचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

अरबाजनं गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी मेकअप आर्टिस्ट शूरा (Arbaaz Khan wife Sshura Khan Latest news) खानसोबत लग्न केले. त्या लग्नाची बॉलीवूडमध्ये मोठी चर्चा होती. त्या लग्नाला सलमान खान सहित सगळे कुटूंबीय उपस्थित होते. या सगळ्यात अरबाजची पत्नी शूरा हिच्या एका पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. तिनं त्या पोस्टमध्ये आपलं इंस्टा अकाउंट हॅक झाल्याचे म्हटले आहे.

शूराचे इंस्टा अकाउंट हॅक झालं....

शूरानं (Sshura Khan News) तिच्या इंस्टा अकाउंटवरुन असे म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात माझ्या इंस्टा अकाउंटसोबत छेडछाड करण्यात आली. त्यामुळे मला खूपच वाईट वाटलं. मी माझं अकाउंट हॅक झालं हे सांगण्यासाठी माझी मैत्रीण शैली भुत्राची मदत घेतली. मी तिलाही धन्यवाद देते.

शूरानं पाच फेब्रुवारी रोजी इंस्टावरुन तीन फोटो पोस्ट केले होते. त्यात ती तिच्या पती अरबाजसोबत दिसत आहे. त्यांच्या त्या फोटोला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट होत्या.

Arbaaz Khan wife Sshura Khan
Jacqueline Fernandez : जॅकलीनचं नेमकं काय सुरुयं? 'सुकेश' विरोधात पोलिसांकडे केलेली तक्रार घेतली मागे!

शूरा ही प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनची मेकअप आर्टिस्ट आहे. शूराचं लग्न हे अर्पिताचं मुंबईतील जे घर आहे तिथे झाले होते. लग्नानंतर शूरा आणि अरबाजनं इंस्टावरुन काही फोटो शेयर केले होते.जे चाहत्यांच्या कौतुकाचा विषय होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com