
Malaika Arora dances at Arjun Kapoor's birthday bash: अर्जुन कपूर हा बॉलिवुडमधला डॅशिंग हिरो आहे. त्याने आता प्रर्यत्न अनेक चित्रपटात काम केलं आहे. मात्र अजूनही त्याला हवे तसे यश मिळालेले नाही. त्याचे एक दोन सिनेमे सोडले तर बाकी चित्रपट हे फ्लॉप गेले आहे. (Arjun Kapoor)
तरी देखील अर्जून हा बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता आहे. तो नेहमीच लाईमलाइटमध्ये राहतो. तो बॉलिवुडची हॉट अभिनेत्री मलायका अरोराला डेट करत आहे.
अर्जून आणि मलायका अरोरा हे इंडस्ट्रीतील पॉवर कपलपैकी एक आहेत. दोघेही एकमेकांवरील प्रेम नेहमी व्यक्त करत असतात.
(Malaika Arora)
आज अर्जुन कपूर त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. यातच मलायकाने तिच्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस खास बनविण्यासाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत मलायकाने तिच्या डान्सने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले.
अर्जुन कपूरने काल रात्री त्याचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या पार्टीत त्याचे मित्र, बहीण अंशुला कपूर आणि तिचा प्रियकरही आणि बरिच मंडळी उपस्थित होती . अर्जुनच्या पार्टीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. ज्यात मलायका बिनधास्तपणे डान्स करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये मलायका तिच्या लोकप्रिय छैय्या छैय्या या गाण्यावर नाचतांना दिसली. 49 वर्षीय मलायकाच्या या डान्स मुव्हने पार्टीत आगच लावली असं नेटकरी म्हणत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पांढऱ्या रंगाचा साइड कट लाँग ड्रेसमध्ये मलायका खुपच हॉट आणि सुंदर दिसत आहे. (Malaika Arora Dance Video Viral)
मलायका अरोरा आणि अर्जून कपूर दोघांनी 2019 मध्ये सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांचे नाते सार्वजनिक केले होते. हे दोघे अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करताना दिसले. अर्जुन आणि मलायकाच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहे.
अर्जुन कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो भूमी पेडणेकरसोबत 'लेडी किलर' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो रकुल प्रीत सिंग आणि भूमी पेडणेकरसोबत एका अनटाइटल्ड प्रोजेक्टमध्ये काम करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.