अर्जुनच्या घरी जमले रणबीर, रणवीर अन करण

टीम इ सकाळ
सोमवार, 26 जून 2017

हाफ गर्लफ्रेंड, गुंडे, इशकजादे असा सिनेमांतून झळकलेला, बोनी आणि मोना कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर याचा आज वाढदिवस झाला. अर्जुन 32 वर्षाचा झाला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी हिंदी सिनेसृष्टीतील आजचे आघाडीचे नायक त्याच्या घरी जमले. 

मुंबई : हाफ गर्लफ्रेंड, गुंडे, इशकजादे असा सिनेमांतून झळकलेला, बोनी आणि मोना कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर याचा मंगळवारी, आज वाढदिवस झाला. अर्जुन 32 वर्षाचा झाला. त्याला शुभेच्छा देण्यासाठी हिंदी सिनेसृष्टीतील आजचे आघाडीचे नायक त्याच्या घरी जमले. 

त्याच्या वाढदिवसाची पार्टी मोठी नव्हती. पण करण जोहर, रणबीर कपूर, रणवीर सिंग यांनी हा दिवस स्पेशल बनवला. ही सगळी मंडळी त्याच्या घरी गेली आणि त्याला केक भरवून त्याचा वाढदिवस साजरा केला. रणबीर आणि रणवीर या दोघांनी त्याच्या घरी धुमाकूळ घातला असणार हे त्यांनी काढलेल्या सेल्फीवरून दिसतेच. विशेष म्हणजे यावेळी अर्जुनचा काका संजय कपूरही हजर होता. मिळालेल्या माहितीनुसार हर्षवर्धन कपूरही या पार्टीला उशीरा जाॅईन झाला. 

अर्जुन कपूरने इशकजादे या सिनेमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले असले, तरी त्याआधी त्याने करण जोहरकडे कामही केले आहे. कल हो ना हो या त्याच्या सिनेमात अर्जुन सहाय्यक दिग्दर्शक होता. 

Web Title: arjun kapoor birth day esakal news