esakal | अर्जुन कपूरने खरेदी केली आणखी एक महागडी कार
sakal

बोलून बातमी शोधा

arjun kapoor

अर्जुन कपूरने खरेदी केली आणखी एक महागडी कार

sakal_logo
By
स्वाती वेमूल

लँड रोव्हर डिफेंडर ही महागडी गाडी खरेदी केल्याच्या काही महिन्यांतच अभिनेता अर्जुन कपूरने Arjun Kapoor आणखी एक महागडी कार खरेदी केली आहे. अर्जुनने Mercedes-Maybach GLS 600 4Matic SUV खरेदी केली असून या गाडीसोबतचा त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्जुन कपूरच्या फॅनपेजवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. 'न्यूज १८'ने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुनच्या या नव्या कारची किंमत २.४३ कोटी रुपये इतकी आहे. ही कार 'जगातील आलिशान एसयूव्ही'मधील एक आहे.

काही महिन्यांपूर्वीच अर्जुनचे लँड रोव्हर डिफेंडर या गाडीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याआधी ३२ व्या वाढदिवशी त्याने Maserati Levante ही गाडी विकत घेतली होती. अर्जुनचा खास मित्र रणवीर सिंग यानेसुद्धा यावर्षी नवीन कार खरेदी केली आहे. रणवीरने Lamborghini Urus Pearl Capsule घेतली असून त्याची किंमत जवळपास ३.४३ कोटी रुपये इतकी आहे. कार्तिक आर्यननेसुद्धा यावर्षी Lamborghini Urus विकत घेतली.

हेही वाचा: 'तारक मेहता..'मधील बबिता-टप्पू एकमेकांना करतायत डेट

अर्जुनचा 'भूत पोलीस' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तो पहिल्यांदाच सैफ अली खानसोबत भूमिका साकारणार आहे. सैफ आणि अर्जुनसोबतच जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम यांच्याही भूमिका आहेत. येत्या १७ सप्टेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

loading image
go to top