सलमानच्या गर्लफ्रेंडचा हॉट फोटो; अर्जुन कपुरने केली कमेंट

वृत्तसंस्था
Sunday, 14 July 2019

सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्यातील वाद संपूर्ण बॉलिवूडमध्ये परिचयाचा आहे. सलमानची बहिण अर्पिता खानसोबत ब्रेकअप केल्यानंतर सलमान आणि अर्जुन यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता अरबाज खानची घटस्फोटीत पत्नी मलायका अरोराला डेट करायला सुरावात केल्यापासून हा वाद आणखी चिघळला.

मुंबई: सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्यातील वाद संपूर्ण बॉलिवूडमध्ये परिचयाचा आहे. सलमानची बहिण अर्पिता खानसोबत ब्रेकअप केल्यानंतर सलमान आणि अर्जुन यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतर आता अरबाज खानची घटस्फोटीत पत्नी मलायका अरोराला डेट करायला सुरावात केल्यापासून हा वाद आणखी चिघळला.

अर्जुनने आता सलमानची गर्लफ्रेंड कतरिना कैफच्या फोटोवर कमेंट केल्यानं चांगलाच चर्चेत आला आहे. कतरिनानं नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यावर अर्जुनने एक गंमतीशीर कमेंट केली असून विशेष म्हणजे यावर कतरिनानं सुद्धा त्याला रिप्लाय दिला आहे.

कतरिनाने नुकताच एक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कोणत्यातरी बीचवर उभी असलेली दिसत आहे. कतरिनाचा हा बिकीनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच अर्जुन कपूरनं तिची फिरकी घेण्याची संधी सोडली नाही. त्यानं या फोटोवर बघ तु कुठे जात आहेस, आशा करतो की, पोज देताना कुठे त्या खांबावर आदळली नसशील. अशी गंमतीशीर कमेंट केली. त्यावर कतरिनानंही त्याला रिप्लाय दिला. ती म्हणाली, मी काळजी घेईन.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: arjun kapoor coment on salman khan girlfriend katrina kaif on instgaram